रत्नागिरीत गुहागरच्या समुद्रकिनारी स्फोटक सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरात मोठी खळबळ

explosive like objects
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – गुहागरच्या समुद्रकिनारी स्फोटक सदृश्य वस्तू (Explosive like objects) आढळल्याने आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या स्फोटकांमुळे (Explosive like objects) समुद्रकिनारी मोठा घातपात घडवण्याचा डाव होता की काय? अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोध नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी संबंधित स्फोटक सदृश्य वस्तू (Explosive like objects) मोकळ्या जागेत नेवून निकामी केली.

गुहागरच्या वेळणेश्वर समुद्र किनारपट्टीवर स्फोटक सदृश्य वस्तू (Explosive like objects) काही नागरिकांना दिसली. त्यानंतर वेळणेश्वर परिसरात मोठी खळबळ उडाली. याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं. घटनेचं गांभीर्य ओळखू वरिष्ठांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर तातडीने रत्नागिरीच्या बॉम्ब शोध नाथक पथकाला याबाबतची माहिती देण्यात आली.

संबंधित स्फोटक (Explosive like objects) हे हॅन्ड हेल्ड रॅकेट पॅराशूट होतं. या हॅन्ड हेल्ड रॅकेट पॅराशूटचा भरकटलेल्या जहाजांना इशारा देण्यासाठी वापर केला जातो. संबंधित घटना ही काल दुपारी गुहागरच्या समुद्रकिनारी घडली. हे स्फोटक (Explosive like objects) बरणीमध्ये होते. त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी बंद बरणीमधील वस्तूला हात न लावता तातडीने पोलिसांना फोन केला. त्यामुळे फोन करणाऱ्या नागरिकांचं पोलिसांनी यावेळी कौतुक केलं. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
IND vs ENG : वन-डे आणि टी20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाकोणाचा आहे समावेश जाणून घ्या

आपले हरवलेले Credit Card कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या

Penny Stocks मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!

Indian Bank कडून कर्ज घेणे महागणार, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढला !!!

Business Idea : कागदापासून ‘या’ वस्तू तयार करून मिळवा भरपूर पैसे !!!