रशियाकडून कार आणि ऑटो पार्ट्सची निर्यात बंद; इंडस्ट्रीवर होणार वाईट परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । युक्रेनवरील हल्ल्यानंतर आता रशियानेही अमेरिका आणि युरोपातील देशांनी लादलेल्या निर्बंधांवर प्रत्युत्तर दिले आहे. रशियाने 200 हून जास्त कार आणि ऑटो पार्ट्सच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. रशिया-युक्रेन संघर्षाचा परिणाम केवळ रशियातच नव्हे तर जगभरातील वाहन उद्योगावर होतो आहे. या निर्णयामुळे वाहन उत्पादक कंपन्यांसमोरील सेमीकंडक्टरचे संकट आगामी काळात आणखी गडद होणार आहे.

कार आणि ऑटो पार्ट्सच्या निर्यातीवर रशियाची बंदी या वर्षाच्या अखेरीपर्यंत कायम राहणार आहे. रशियाच्या निर्यातीच्या लिस्टमधून काढून टाकलेल्या वस्तूंमध्ये ऑटो, टेलिकॉम, औषध, शेती, इलेक्ट्रिक उपकरणे आणि लाकूड यांचा समावेश आहे. याबद्दल, रशियाने सांगितले की, त्यांनी “रशियाविरूद्ध प्रतिकूल कारवाई करणाऱ्या राज्यांना विविध प्रकारचे लाकूड आणि लाकूड उत्पादनांची निर्यात स्थगित केली आहे.”

“हे उपाय रशियावर लादलेल्यांना तार्किक प्रतिसाद आहेत आणि अर्थव्यवस्थेच्या प्रमुख क्षेत्रांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आहेत,” रशियाच्या अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

रशियामधून बाहेर पडणाऱ्या पाश्चात्य कंपन्यांच्या मालकीच्या सर्व मालमत्तेचे राष्ट्रीयीकरण करण्याच्या रशियाच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल पुढे आले आहे. गेल्या महिन्यात संघर्ष वाढल्यानंतर, अनेक कार निर्मात्यांनी रशियामधील ऑपरेशन्स थांबवण्याचा निर्णय घेतला. या कंपन्यांमध्ये Honda, Toyota, Volkswagen, General Motors, Jaguar Land Rover, Mercedes-Benz या कार उत्पादकांचा समावेश आहे.

Jeep, Fiat आणि Peugeot सारख्या ब्रँडची मालकी असलेली Stellantis देखील गुरुवारी या लिस्टमध्ये सामील झाली. कंपनीने सांगितले की,”त्यांनी रशियाला कारची आयात आणि निर्यात स्थगित केली आहे. स्टेलांटिसचा रशियातील कलुगा येथे मॅन्युफॅक्चरींग प्लॅन्ट आहे, जो मित्सुबिशीच्या पार्टनरशिप मध्ये आहे.”

ह्युंदाई, रशियामधील प्रमुख परदेशी कार निर्मात्यांपैकी एकाने अलीकडेच जाहीर केले की, पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे काही काळ थांबल्यानंतर ते मॅन्युफॅक्चरींग पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. मात्र, कार आणि ऑटो पार्ट्सच्या निर्यातीवर रशियाची बंदी कायम राहिल्यास, ह्युंदाईला पुन्हा ऑपरेशन सुरू करणे कठीण होऊ शकते.

Leave a Comment