रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा!! E-KYC प्रक्रियेसाठी 30 मार्चपर्यंत मुदतवाढ

0
35
E-KYC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकारने (Central Government) सार्वजनिक वितरण प्रणालीतील सर्व रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया सक्तीची केली आहे. याआधी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी होती. मात्र, नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ई-केवायसी प्रक्रियेच्या मदतीत ३० मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता नागरिकांनाही ई-केवायसी करण्यासाठी आणखी काही दिवस मिळणार आहे.

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास शिधा वितरण थांबवले जाऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. ई-केवायसी करण्यासाठी नागरिकांना यापूर्वी रेशन दुकानातील ई-पॉस (e-POS) मशिनवर अंगठा स्कॅन करावा लागत होता. मात्र, वारंवार सर्व्हर डाऊन होण्याच्या तक्रारी, तसेच काही शिधापत्रिकाधारक बाहेरगावी असल्यामुळे अनेकांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे शक्य झाले नाही.

ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने दोन नवीन मोबाईल अॅप्स सुरू केली आहेत – “Mera e-KYC Mobile App” आणि “Aadhar Face RD Service App”. या अॅप्सच्या मदतीने नागरिक घरी बसून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

ई-केवायसी करण्याची प्रक्रिया –

  1. Google Play Store वरून “Mera e-KYC Mobile App” आणि “Aadhar Face RD Service App” हे अॅप्स डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे.
  2. Mera e-KYC Mobile App उघडून राज्य आणि ठिकाण निवडावे.
  3. आधार क्रमांक टाकून आलेला OTP भरावा आणि सबमिट करावे.
  4. Face e-KYC पर्याय निवडून सेल्फी कॅमेरा सुरू करावा.
  5. डोळ्यांची उघडझाप करून चेहऱ्याचा फोटो काढावा.
  6. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर “e-KYC पूर्ण” झाल्याचा मेसेज मिळेल.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सर्व रेशनकार्ड धारकांनी ३० मार्चपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी मोबाईल अॅपच्या मदतीने घरबसल्या ई-केवायसी करावे किंवा जवळच्या रेशन दुकानात जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे, रेशनकार्ड धारकांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास शिधा मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी लवकरात लवकर ई-केवायसी करणे आवश्यक आहे.