विद्यापीठातील पदव्युत्तर प्रवेशाला पुन्हा एकदा मुदतवाढ

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रवेश नोंदणीला आता 15 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत 3 हजार 687 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली, तर 3 हजार 203 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. परंतु, अर्ज सबमिट केले नसल्याने ते अर्ज अपूर्ण आहेत. यामुळे पदव्युत्तर प्रवेशाची दुसऱ्यांदा मुदतवाढ करण्यात आली आहे.

सन 2021-22 शैक्षणिक वेळापत्रकात 30 सप्टेंबर पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन एक ऑक्टोबरपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होईल, असे नियोजन करण्यात आले होते. परंतु प्रवेश नोंदणीला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद पाहून नोंदणीला आधी दहा दिवसांची तर आता पुन्हा पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, यावर्षी अतिवृष्टीमुळे विद्यापीठातील शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी अधीसभेचा बैठकीत जाहीर केला होता.

आता सुधारित वेळापत्रकानुसार 16 ऑक्टोबरला सायंकाळी पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर होईल. 16 ते 18 ऑक्टोबर पर्यंत आक्षेप, हरकती पदव्युत्तर विभाग मेलद्वारे स्वीकारणार आहे. यानंतर अंतिम प्रवेश यादी 18 ऑक्‍टोबरला सायंकाळी जाहीर होईल. शैक्षणिक वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रथम सत्र परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल होण्याची शक्यता आहे. तर 25 ऑक्टोबर पासून पहिल्या सेमिस्टर चे वर्ग सुरू होतील, असे प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले आहे.

You might also like