कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
गेल्या अनेक दिवसांपासून कराड तालुक्यात बिबट्याचा वावर आहे. मध्यंतरी कराड तालुक्यातील येणके गावाजवळ ऊसतोड सुरू असताना बिबट्याने पाच वर्षीय मुलावर हल्ला केला. त्याला जवळच्या शिवारात अर्धा किलोमीटर दूर उचलून नेऊन ठार मारले. मात्र, त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून बिबट्याला पकडलेली. मात्र, आता अजून एक बिबट्याचे पिल्लू पकडल्याचा व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे. कराड तालुक्यातील कुसुर तर कोणी एनके या गावात संबंधित बिबट्याचे पिलू पकडण्यात आल्याचा उल्लेख करीत व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कराड तालुक्यातील अनेक भागात बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी कराड तालुक्यातील येणके गावाजवळ ऊसतोड सुरू असताना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्याने पाच वर्षीय मुलावर हल्ला केल्याची घटना घडली होती. यावेळी बिबट्याने मुलाला जवळच्या शिवारात अर्धा किलोमीटर दूर उचलून नेऊन ठार मारले. या घटनेने कराड तालुक्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर एका बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून पकडले.
https://twitter.com/Princy_Vishu/status/1468184396670717952
मात्र, त्यानंतर पुन्हा कुसूर येथे एक वाघीण तीन पिलांना घेऊन रस्त्यावरून चालत जात असल्याचा व्हिडीओ कराड तालुक्यात व्हायरल झाला होता. त्यामुळे लोकनाच्यात खबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हा व्हिडीओ फेक असल्याचे सांगण्यात आले. आता त्यानंतर कुसूर येथे एका उसाच्या फडात उसतोडकरी मजुरांना बिबट्याचे पिल्लू सापडले असल्याचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. मात्र, संबंधित गावातील ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा व्हिडीओ खोटा असून असा काहीच प्रकार घडला नसल्याचे सांगितले आहे.