मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्राची आजची सकाळ राजकीय भूकंपाने झाली. काल संध्याकाळ पर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे अशी माध्यमांना माहिती देण्यात आली होती. दरम्यान एका रात्रीत महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा ९० अंशांनी फिरत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याहून मोठा धक्का म्हणजे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणं. कालपर्यंत राष्ट्रवादी, शिवसेना-काँग्रेस सोबत असताना अचानक अजित पवार हे भाजपच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसणार म्हटल्यावर. सत्तेत जाण्याचा नेमका निर्णय कुणाचा असा सवाल उपस्थित झाला आहे. या सर्वात अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार यांच्या विधानाचा एक सरळ अर्थ म्हणजे अजित पवार यांनी राष्ट्रवादीशी बंड पुकारलं आहे. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांचे भाजपाला पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले. तसेच मात्र,आता शपथविधी झाला पण पुढं काय ? हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यानुसार फडणवीस याना आता विधिमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. ३० नोव्हेंबर पर्यंत हे बहुमत याना सिद्ध करताना काय घडू शकते याबाबत अनेक शक्यता निर्माण होताना दिसत आहेत.
भाजपला सरकार स्थापनेसाठी विधिमंडळात विश्वसदर्शक ठरावाला समोर जावं लागणार आहे. सर्वात आधी विधानसभेचे अधिवेशन बोलवावं लागेल. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून मतदानातून निवड होणार. नंतरच विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडेल नंतरच फडणवीस याना बहुमत सिद्ध करता येईल. भारतीय राज्यघटनेनुसार बहुमताचा आकडा १४५ हा भाजपकडे असण गरजेचं आहे. मात्र हे करत असताना पक्षांअंतर्गत काद्यानुसार राष्ट्रवादीचे २ तृतीयांश म्हणजे ३६ आमदार राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतरच भाजपचे सरकार अस्तित्वात येऊ शकते. त्यापेक्षा कमी आमदार बाहेर पडल्यास या आमदारांवर पक्षांतर काद्यानुसार निलंबित करण्यात येईल. दरम्यान शपथविधीवेळी राष्ट्रवादीचे किमान १५ आमदार उपस्थित होते. तेव्हा अजित पवार समर्थक गटाच्या गळाला पक्षातील किमान आमदार जरी लागले तर काय? अशी टांगती तलवार राष्ट्रवादीवर आहे. तसेच अपक्ष आमदारांनी भाजपाला साथ दिली तर भाजपचे सरकार अस्तित्वात्त येईल.
इतर महत्वाच्या बातम्या –
अजित पवारांच्या अंतर्गत खेळीत समाविष्ट कोण? शपथविधीला राष्ट्रवादीचे 'हे' बडे नेते उपस्थित@AjitPawarSpeaks @NCPspeaks @PawarSpeaks @ShivSena#hellomaharashtra#UddhavThackeray#Maharashtra #ShivaSena#DevendraFadnavis #MaharashtraGovtFormation https://t.co/pFR4qxiPfG
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांवर केला 'हा' आरोप@PawarSpeaks @AjitPawarSpeaks @NCPspeaks#hellomaharashtra #MaharashtraGovtFormation #UddhavThackeray #AjitPawar #Maharashtra https://t.co/poMUTApeeY
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
तर शरद पवार, तुम्ही महाराष्ट्राचे गुन्हेगार आहात..!! शिवसेनेचा गेम शरद पवारांकडूनच?@PawarSpeaks @NCPspeaks @ShivSena#hellomaharashtra #UddhavThackeray #MaharashtraGovtFormation#Maharashtra #ShivaSena #DevendraFadnavis #MahaKhichdiSarkar # https://t.co/94KxdMUrsp
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
अजित पवारांनी महाराष्ट्राच्या आणि शरद पवारांच्या पाठीत खंजिर खूपसला – संजय राऊत@rautsanjay61 @PawarSpeaks @NCPspeaks @ShivsenaComms@BJP4Maharashtra#hellomaharashtra https://t.co/O8M4DZRnIk
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
शरद पवार अनभिज्ञ, राष्ट्रवादीच्या सुत्रांची माहिती@NCPspeaks @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @praful_patel#hellomaharashtrahttps://t.co/ygla55KM9l
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली – चंद्रकांत पाटील@ChDadaPatil @BJP4Maharashtra@ShivSena @rautsanjay61 https://t.co/SNPoI4UVoE#hellomaharashtra#UddhavThackeray #MaharashtraGovtFormation #Maharashtra #DevendraFadnavis
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
शरद पवारांच्या संमतीशिवाय सरकार बनलं हे पवारांना सिद्ध करावं लागेल – प्रकाश आंबेडकर@Prksh_Ambedkar @PawarSpeaks#hellomaharashtra#UddhavThackeray #MaharashtraGovtFormation #Maharashtra #ShivaSena #DevendraFadnavis #MahaKhichdiSarkar https://t.co/bPbCv7NjEp
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019