अकोला प्रतिनिधी । महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या बाबतीत वेगवेगळी मतांतरे पुढं येत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नव्या सरकारबद्दल आपली प्रतिक्रिया एक विडिओ जारी करत दिली आहे. या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा आधार घेत आंबेडकर यांनी एक मोठ विधान केलं. भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा निवडणुकीपूर्वीच झाला होता असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं होत. याबाबत ‘आम्ही वारंवार सरकारला प्रश्न विचारात राहिलो त्यामुळंच फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला’ असा दावा आंबेडकर यांनी दिला.
तसेच ‘मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यात १० सप्टेंबरला एक गुप्त बैठक झाली होती.’ अजित पवार यांच्या रूपानं राष्ट्रवादीने भाजपासोबत जाणं हा त्याचाच भाग आहे. असा गौप्यस्फोट सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच नवं सरकारबाबत मी साशंक आहे असेही ते यावेळी बोलले.