हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री पदाच्या वादातून शिवसेना आणि भाजप मधील 25 वर्षाची युती तुटली आणि शिवसेनेने काँग्रेस- राष्ट्रवादीच्या बळावर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. दरम्यान, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माझं जर ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते, असं आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हंटल.
आठवले म्हणाले, सत्तासंघर्षाच्या काळात मी फडणवीसांना सल्ला दिला होता की शिवसेनेला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद देऊन टाका. त्यांनी तेव्हा माझं ते म्हणणं ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते, असं आठवले म्हणाले. तसेच तुमच्या दोघांच्यात एकमत होत नसेल तर मला मुख्यमंत्री करा, असंही त्यावेळी मी सांगितलं होतं, असेही आठवले म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं तोंडभरून कौतुक केले. कोरोना काळात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी उत्तम काम केलं. कोरोनाच्या काळात आरोग्य खातं चालवणे नव्हते सोपे, पण त्याला पुरुन उरले राजेश टोपे…’, अशा शब्दात आठवलेंनी राजेश टोपे यांना शाबासकी दिली.