हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) टीका करत या दोघांना माकड म्हणून संबोधले होते. आता त्यांच्या याचं टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यांना डॉक्टरांच्या उपचारांची गरज आहे” असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका करत देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले की, “सध्या उद्धव ठाकरे यांना शिव्यांशिवाय दुसरे काहीही सुचत नाही. जनतेने त्यांना रिजेक्ट केलेलं आहे त्यामुळे ते शिवीगाळ करण्यावर उतरले आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांच्यावर उपचार करावेत, त्यांना डॉक्टरांची गरज आहे.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
त्याचबरोबर, “पवार साहेबांसोबत पक्ष अजित पवार यांनी उभा केला. पण त्यांना पक्षात स्थान मिळणार नाही, स्थान पवार साहेब सुप्रियांना देतील म्हणून ते बाहेर पडले. अजित पवार उद्धवजींना किती ओळखतात माहीत नाही. मी त्यांना चांगला ओळखतो, सध्या उद्धव साहेबांचे गाईड पवार साहेब आहेत. ते जे बोलतील ते उद्धव करतील” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते??
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, दिल्लीश्वरांची दोन चावीची माकडं सोडलं आहे. एक माकड आहे दाढीवालं… दुसरे उपमुख्यमंत्री आहे ते देगंफ… ज्याला तुम्ही काय म्हणता? ते भांग प्यायलेल्या माकडांसारखं बोलतात.. शिवसेना हा छोटा पक्ष आहे का? माझं त्या दोन्ही माकडांना सांगणं आहे की, बाप बदलण्याची गरज मला नाही तुम्हाला आहे.”