हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी रॉयल चॅलेंजर बंगळुरू ने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू फाफ डुप्लिसीसची कर्णधारपदी निवड केली आहे. माजी कर्णधार विराट कोहली याने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आरसीबी कोणाला कर्णधार करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर डुल्पेसीस ची निवड करण्यात आली आहे.
फाफ डुप्लिसीस शिवाय ऑस्ट्रेलियन बॅट्समन ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक हे सुद्धा कर्णधार पदाच्या शर्यतीत होते. मात्र अखेर डु ल्पेसीसच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. डु ल्पेसीस आयपीएलमध्ये 100 सामने खेळले असून 34.94 च्या सरासरीने 2935 धावा केल्या आहेत. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 22 अर्धशतके केली आहेत.
https://twitter.com/RCBTweets/status/1502603973848494087?t=GAruz9RFwl_aA7z5Do5qwg&s=19
फाफ डुल्पेसीसने यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स कडून खेळताना अनेक अविस्मरणीय खेळ्या खेळल्या आहेत. यंदा चेन्नईने त्याला करारमुक्त केल्यानंतर आरसीबीने त्याला 7 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. आरसीबीला अद्याप एकदाही आयपीएल जिंकता आले नाही. त्यामुळे फाफ डुल्पेसीस वर एक मोठी जबाबदारी पडली आहे.