हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। देशात कोरोना व्हॅक्सिनेशन सुरु झाल्यापासून लसींचा पुरेसा पुरवठा नसल्यामुळे सर्वाना व्हॅक्सिन मिळणे कठीण झाले आहे. खूप प्रतीक्षेनंतर एखाद्याला लस मिळतानाचे दृश्य दिसत आहे. अश्यात सर्वसामान्य लोक गेल्या काही दिवसांपासून व्हॅक्सिन रजिस्ट्रेशन केल्यानंतर स्लॉट कधी मिळणार याकडेच डोळे लावून बसले आहेत. दरम्यान सेलिब्रेटी मात्र बनावट आयडीच्या माध्यमातून व्हॅक्सिन घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री मीरा चोप्राने बनावट आयडीद्वारे व्हॅक्सिन घेतल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता भाभीजी घर पर है फेम अभिनेत्री सौम्या टंडनेदेखील अशाच प्रकारे व्हॅक्सिन घेतल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर तिने ट्विटरवर लोकांना स्पष्टीकरण देत या बातम्या खोट्या असल्याचं दावा केला आहे.
Contrary to some media reports claiming that I have taken my first Covid vaccine dose from A facility in Thane by dubious means is untrue. I have taken my first jab but from a centre near my house following proper procedures. Please don’t believe in unverified reports and claims.
— Saumya Tandon (@saumyatandon) June 4, 2021
अभिनेत्री सौम्या टंडनचा फोटो असलेले एक ओळखपत्र समोर आले आहे. फ्रंटलाइन वर्कर असल्याचे सांगत ठाण्यातील एका रुग्णालयातून सौम्याने कोरोना लसीकरण करून घेतल्याचा आरोप सध्या तिच्यावर केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ओळखपत्रावर सौम्या ही फ्रंट लाइन वर्कर असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
After #Meerachopra #Bhabhijigharparhain actress @saumyatandon is Accused Of Getting Vaccine Out Of Turn.
A screenshot of the ID #Saumyatondon used is viral now. The picture shows her as a Admin for an Om Sai Aarogya Care under which she got the vaccine as a frontline worker. pic.twitter.com/EqQZ6QTYZl— Whats In The News (@_whatsinthenews) June 4, 2021
यावर सौम्याने ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे. समोर आलेली माहिती हि साफ चुकीची असल्याचे तिने म्हटले आहे. मी ठाण्यातून लस घेतलीच नाही असे म्हणत बनावट ओळखपत्राद्वारे लस घेतल्याचा आरोप निराधार असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील हे स्पष्टीकरण तिने ट्विटरवर ट्विट करीत दिले आहे.
https://www.instagram.com/p/COzgKuJFHOO/?utm_source=ig_web_copy_link
‘भीभीजी घर पर है’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. हि मालिका अगदी यशाच्या काठोकाठ टोकापर्यंत असतानाच अभिनेत्री सौम्य टंडनने हि मालिका सोडली. तिच्या मालिकेतील एक्झिटमुळे शोच्या लोकप्रियतेवर साधारण फरक पडला. मात्र मालिकेत तिची भूमिका आता मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे साकारत आहे. सौम्याइतकेच लोक नेहावरही भरभरून प्रेम करत आहेत. साचेबद्ध कामात अडकून न राहता वेगळे काही तरी करण्याची सौम्याने इच्छा दर्शविली होती आणि म्हणूनच लोकप्रिय भूमिका आणि तितकीच लोकप्रिय मालिका सोडल्यानंतर ती तिच्या खासगी आयुष्यातील इतर बाबी एन्जॉय करत आहे.