थर्ड अँगल | निजामुद्दीनचा मीडिया ट्रायल संपला, दुसऱ्या दिवशी ANI च्या न्यूज फिडनं एक बातमी देशभरात पाठवली. तबलिगी पेशंट डॉक्टरांंवर थुंकत आहेत. नेहमीप्रमाणे मला बातमीवर विश्वास बसला नाही. कारण मी ANI नं गेल्या पाच वर्षात कशा रीतीने भाजपच्या सोयीच्या बातम्या रचल्या व त्या न्यूज फिडनं प्रसारित केल्या याचा कारव्हानचा मे 2019 चा रिपोर्ट वाचला आहे. पण एकाने मेसेजला येऊन मला खोचक सवाल टाकला. त्याला दिलेलं उत्तर मी इथं वॉलवर डकवलं. ते अजूनही आहे. ते विधान मागं घेण्याचं कारणही नाही. गोदी मीडिय़ाच नव्हे तर अनेक पेड मीडियानंदेखील ही बातमी विकृत पद्धतीने मांडली. मोदी मीडियानं प्राइमटाइम सजवली. त्यातून द्वेष प्रसारित केला. दिवसभर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या येत राहिल्या. इथली लिबरल व सेक्युलर म्हणवणारी मंडळी वॉलवरून त्याआड द्वेष आणि हिणकसपणा प्रसारित करून आपल्या निर्बुद्धपणाचा पुरावा देत होती. बरीच विचारी म्हणवणारी लोकंदेखील या फेक बातमीवर कुत्सित व टार्गेटेड बोलत होती. त्यातून संपूर्ण समाजाविरोधात चेतवण्याची भाषा होती.
मीडियातली लोकं नेहमीप्रमाणे मुसलमानांना विकृत भावनेनं बघण्याचे धडे जगाला देत होती. परंतु त्याच दिवशी टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी फेक असल्याचं जाहीर केलं. मूऴ व्हिडिओ मुंबई मिररनं काढला होता. काही वर्षांपूर्वीचा तो व्हिडियो होता. Alt न्यूज, बीबीसी, क्विंट, इंडियन एक्सप्रेससारख्या (चांगल्या) मीडियानं पाठपुरावा करत त्यातला खोटा भाग जगासमोर मांडला. पण आता काहीही करता येणार नाही. लोकांच्या मनात ‘फेक नरेशन’ म्हणजेच ‘खोटा समज’ तयार झाला आहे. बरं याला कारण कोरोनासारख्या भयान मृत्युच्या भयाचं आहे. त्यामुळेे त्यांना माफ करुया. वास्तविक बातमी बाहेर आल्यानंतरही ही लोकं त्या फेक बातमीचा वापर समाजामध्ये विष कालवण्यासाठी करत आहेत. त्यामुळे त्यावर युक्तिवादात मुसलमानांनी आपली एनर्जी खर्च घालू नये. ते फेक न्यूजच्या नरेटिव्ह दुनियेत जगत आहेत. त्यांना हलवून काही फायदा नाही.
“जो होना था वह हो गया, अपने अच्छे अखलाको का मुजाहरा करते हुए फिर से लोगो का दिल जीत लो.”
मग तुम्ही काय करायचं. तर थांबा सांगतो.
१) “आपल्या नातेवाईक, मित्र व संपर्कातील 5-5 लोकांना फोन लावून सांगा. तुमच्या घरात कुणी निजामुद्दीनहून आला असेल तर त्याला घेऊन हॉस्पिटलला जा. हे लक्षात असू द्या की ती लोकं बदनामीच्या भीतीनं पुढे येत नाहीयेत. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन सांगा. आम्ही ही माहिती गुप्त ठेवू, सर्वांनी हे काम करायचंय.
२) दूसरं म्हणजे जे लोकं त्या काळात दिल्लीहून आले त्यांनी स्वत:हून प्रशासनाशी संपर्क साधावा. याद राखा की तुम्हाला आता व्हिलन ठरवलं गेलं आहे. त्यामुळे तुमची तुर्तास तरी सुटका नाही. तुम्ही कुणापासून लपत आहात? तुम्हे गैब की आवाज पता होंगी. अपने जिद के वजह से तमामा घरवालों कि जिंदगी खतरे में मत डालो. बाहेर निकलो और हॉस्पिटलाईलज्ड हो जाओ.
३) तिसरं अजून एक काम तुम्ही करू शकता. होम क्वारंटाईन म्हणजे घरातल्या घरात स्वत:ला वेगळं ठेवा. ज्यावेळी भाजपच्या कम्युनल अजेंड्याच्या आहारी जाऊन बहुसंख्य समाजाने तुमचं अलगीकरण केलं आहे, अशावेळी होम क्वारंटाईनला तुम्ही सहज पार करू शकता. “जिन्हें क्वारंटाईन किया गया हैं, वह तसबीर लेकर एक ही जगह बैठे रहें. तिलावत करते रहें और अल्लाह से तमाम उम्मत के लिए दुआ करे.” इकडे तिकडे बाहेर फिरु नका तसं सेंटरच्या बाहेर पडू नका. याद राखा फेक न्यूजवाले, मीडिया व समाजातले तुमचे द्वेषबांधव तुमचा पाठलाग करत आहेत. त्यामुळे नियमांचं पालन करा.
४) अजून एक करा नमाजसाठी सामूहिक प्रयत्न करू नका किंवा असे प्रयत्न सफल होऊ देऊ नका. गिदढ की मौत कि कहावत पता होंगी. पण प्रश्न इथं तुमच्यापुरता नाही तर समाजाचा आहे. त्यामुळे नमाज अदाच करायची असेल तर २४ तास सजदे में राहा आणि जग शांतीसाठी दुआ करत राहा. मेरे भाई लोग बराय मेहेरबानी घर मे ही रहो.
५) शेवटचं काम, थुंकण्याच्या खोट्या घटनेला युक्तिवाद करत बसू नका. बीजेपीच्या IT सेलच्या प्रचाराला बहुसंख्य प्रथमच बळी पडतोय अशातला भाग नाही. त्यामुळे उन्हे बख्श दो. जी लोकं अनावधानाने या प्रचारात उतरली होती ‘वो सुबह के भूले हैं, शाम तक घर आ ही जायेंगे.’
बर काही लोकांना खोट्या जगात वावरायचं असेल तर तुम्ही त्यांना बाहेर काढू शकत नाही. तबलिगीच्या कृत्याचं समर्थन करू नका. ते दिल्लीत दोषी नव्हते, तिथं प्रशासनाने त्यांना जाणून बुजून मदत नाकारली. त्यामुळे ते संक्रमित झाले. पण ते आता बाधित झालेले असून समोर येत नाहीत म्हणजे ते गुन्हेगार आहेत. गुन्ह्याचं कधीच समर्थन होऊ शकत नाही. हा लढा जसा आरोग्याचा आहे तसाच तो आता राजकीय झालेला आहे. त्याला त्याच भाषेत उत्तरं द्यायला हवीत. चलो भाई लग जाओ काम पर…!!
कलीम अजीम यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरुन ही पोस्ट लिहली आहे. सध्या मुस्लिम समाजाविषयी तेढपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सोशल मीडिया कमेंटमधून सहजपणे दिसून येतो. त्यामुळं योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहचवून त्यांना विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी हा लेख त्यांच्या पूर्वपरवानगीने आपल्यापर्यंत पोहचवत आहोत. अधिक संपर्कासाठी – 9561190500
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला
राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत
अंडरवर्ल्ड डाॅनची क्वीन’वर नजर; पॅरोलवर सुटताच डॅडी अरुण गवळीचा नवा ‘गेम
उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..