प्रसिद्ध अभिनेत्रीचा ‘या’ माजी मंत्र्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चेन्नई : वृत्तसंस्था – चेन्नईमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्नाचे आमिष दाखवून तिचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामधील आरोपी हे माजी मंत्री आहेत. या प्रकरणी पीडित अभिनेत्रीने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिने दोघांचे सोबतचे काही फोटोज पुरावे म्हणून पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अजून कोणालाच अटक करण्यात आली नाही.

काय आहे प्रकरण
पीडित अभिनेत्री तमिळ चित्रपटसृष्टीमधील आहे. या अभिनेत्रीने अण्णा द्रमुकचे माजी मंत्री डॉ. मणिकंदन यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तिचे मागच्या काही वर्षांपासून डॉ. मणिकंदन यांच्याशी प्रेमसंबंध होते. असा आरोप करण्यात आला आहे. हि अभिनेत्री मुळ मलेशिया या देशाची असून मागील काही वर्षांपासून ती तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहे. पीडित अभिनेत्री 2017 मध्ये पहिल्यांदा मणिकंदन यांना भेटली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या दरम्यान डॉ. मणिकंदन यांनी या अभिनेत्रीला लग्नाचे आमिष देऊन अनेकवेळा तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवले. मागच्या ५ वर्षांपासून त्यांचे संबंध सुरु होते.

यानंतर अभिनेत्रीने त्यांना जेव्हा लग्नाबद्दल विचारले तेव्हा मणिकंदन यांनी लग्न करण्यास नकार दिला असे अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. तसेच मणिकंदन यांच्या प्रेमसंबंधातून हि अभिनेत्री गर्भवती झाली असता, तिला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला. तसेच याबद्दल कोणाला काही सांगितले तर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकीसुद्धा मणिकंदन यांनी दिली होती. यानंतर या अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल करून पुरावा म्हणून मणिकंदन यांच्यासोबतचे काही फोटोदेखील पोलिसांना दिले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.