हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याची मागील रविवारी अचानक तब्येत बिघडली. बघता बघता त्याच्या छातीत कला येऊ लागल्या. छातीत दुखू लागल्यामुळे त्याला त्वरित मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी तपासल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे समोर आले. यामुळे क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांनी त्याची अँजिओप्लास्टी केली. आता हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळत आहे.
Anurag Kashyap undergoes angioplasty after mild chest pain#AnuragKashyap #BollywoodBubble @anuragkashyap72 https://t.co/yKU4U1m2O7
— Bollywood Bubble (@bollybubble) May 27, 2021
ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या छातीत आणि शरीरात अचानक कळा उठू लागल्या. त्यानंतर रुग्णालयात गेले असता, डॉक्टरांनी चेकअप केले. पुढे लगेचच त्याची अँजिओप्लास्टी केल्यानंतर समजले की, अनुराग कश्यपच्या हृदयात ब्लॉकेजेस आहेत. त्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात सर्जरीसाठी दाखल करण्यात आले. अनुराग कश्यपच्या जवळच्या व्यक्तीने सूत्रांना अशी माहिती दिली आहे की, सध्या अनुरागची सर्जरी झाली आहे आणि तो आधीपेक्षा निश्चितच आता बरा आहे. हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा होते आहे. डॉक्टरांनी एक आठवडा पूर्ण आराम करायला सांगितले आहे. त्यानंतर अनुराग काम करण्यासाठी सज्ज होऊ शकतो.
.@anuragkashyap72 underwent angioplasty after he complained of a mild chest pain
Here's wishing the talented director a speedy recovery! #AnuragKashyaphttps://t.co/RXqiuU12Or
— ETimes (@etimes) May 27, 2021
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग काश्यपच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर त्याचा ‘दोबारा’ हा चित्रपट वर्क इन प्रोग्रेसमध्ये आहे. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. मनमर्जिया चित्रपटानंतर अनुराग आणि तापसी पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.
https://www.instagram.com/p/CLk8mqrB6PH/?utm_source=ig_web_copy_link
या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे सध्या जोरदार काम सुरू आहे. आयकर विभागाच्या छापा प्रकरणानंतर अनुराग कश्यप माध्यमांपासून व वृत्तांपासून दूर आहे. ट्विटरवर नेहमी सक्रीय असणाऱ्या अनुरागची लेक आलिया कश्यपदेखील त्याच्यासारखी सोशल मीडियावर चांगलीच एक्टिव्ह आहे. ती सतत वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत येत असते.