मित्रांच्या सोबतीने क्रॉक्रोज करतोय कोरोनाग्रस्तांची सेवा; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे देशात मृत्यूचे तांडव सुरु आहे. सर्वत्र भयंकर स्थिती निर्माण झाली असताना आरोग्य यंत्रणा मात्र कोलमडताना दिसतेय. त्याचबरोबर रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन मिल्ने देखील मुश्किल झाले आहे. परिणामी रुग्ण मोठ्या संख्येने दगावत आहेत. अशातच अनेक सेलिब्रिटी स्वतःहून मदतीला धावून येत आहेत. अशा कठिण परिस्थितीत प्रेखकांचा लाडका क्रॉक्रोज अर्थात डान्सर राघव जुयाल आपल्या मित्रांना सोबतीला घेऊन दिवस रात्र कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करत आहे. त्याच्या या कार्यासाठी त्याचे विशेष कौतुक केले जात आहे.

https://www.instagram.com/tv/CPkOawoBbZA/?utm_source=ig_web_copy_link

सध्या ऑक्सीजन कंसन्ट्रेटर उपलब्ध करुन देण्याचे काम राघव व त्याचे सहकारी करत आहेत. अनेक कलाकार जमेल तशी आपापल्या परीने मदत करताना दिसत आहेत. इतरांनाही या कठिण प्रसंगी जमेल तितकी मदत करण्याचे आवाहनही ते करीत आहेत. दरम्यान राघव जुयाल एकमेकांना मदत करत राहा, कठिण काळात एकमेकांना आधार द्या असे प्रत्येकाला आवाहन करतोय.

https://www.instagram.com/p/CPf80fQBfBO/?utm_source=ig_web_copy_link

सोशल मीडियाच्या माध्यमातून तो सगळ्यांना सकारात्मक संदेश पसरवण्याचेही आवाहन करत आहे. मध्यंतरी डान्स दिवानेच्या सेटवरही टीममधील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात राघवलाही कोरोनाची लागण झाली होती. याबाबत त्याने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती. ताप आणि खोकला आल्यामुळे त्याने कोरोना चाचणी करून घेतली होती. त्यातच त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्या आणि कोरोना चाचणी करून घ्या. सर्व प्रोटोकॉल पाळा. सुरक्षित राहा’. अशा आशयाची पोस्ट राघवने केली होती.

https://www.instagram.com/tv/CPXTv9YhOO9/?utm_source=ig_web_copy_link

राघव जुयाल हा डान्स इंडिया डान्स या लोकप्रिय डान्सिंग रिऍलिटी शोचा अत्याधिक लोकप्रिय स्पर्धक होता. त्यानंतर आपल्या अनोख्या नृत्य शैलीच्या बळावर त्याने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करीत आपला असा चाहता वर्ग तयार केला आहे. त्याच्या गजब नृत्य शैलीमुळे त्याने स्वतःच स्वतःचे नाव क्रॉक्रोज असे ठेवले होते आणि आजही लोक त्याला ह्याच नावाने नावाजतात.

https://www.instagram.com/tv/CPSVwDGhLtN/?utm_source=ig_web_copy_link

सध्या तो ‘डान्स दिवाने ३’ या शोला होस्ट करत आहे.’डान्स दिवाने ३’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळतेय. त्यात राघवचा कॉमेडी अंदाज चाहत्यांच्या विशेष पसंतीचा भाग आहे. राघव सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी त्याच्या चाहत्यांपर्यंत तो पोहचवत असतो. त्यामुळे राघव करत असलेल्या कार्यासाठी त्याचे चाहते त्याच भरभरून कौतुक करत आहेत.

Leave a Comment