हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अभिनेता आणि एल्डर या औषध निर्मिती कंपनीचा सीओओ अनुज सक्सेनाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक विभागाकडून हि कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर गुंतवणूकदाराचे १४१ कोटी रुपये बुडवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. कंपनीच्या एका गुंतवणूकदारानेच ही तक्रार दाखल केली आहे. २०१२ मध्ये अनुजने गुतवणूकीचा मोबदला देण्याचे आश्वासन दिलं होते मात्र अद्याप ते न मिळाल्याने त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अनुजची चौकशी करण्याचे आदेश ईओडब्ल्यूकडून देण्यात आले आहेत. मात्र अनुजने हे आरोप फेटाळून लावले आहेत. अनुज म्हणाला कि तो एक मेडिकल प्रॅक्टिशनर असून सध्या त्याच्या कंपनीत पीपीई किट आणि सॅनिटायझरची निर्मिती केली जात आहे. सध्याच्या महामारीच्या काळात या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याने ही चौकशी पुढे ढकलण्यात यावी असे अनुजने सांगितले आहे.
यानंतर न्यायाधिश अभिजीत नांदगावकर यांनी अनुज जरी एक चिकित्सक असला आणि त्याची कंपनी सध्याच्या काळात महत्वाचे असलेले पीपीई किट तयार करत असली, तरी त्याने गुतवणूरदारांची फसवणूक केली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या तक्रारीकडे दूर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे अनुजला सोमवारपर्यंत अनुजला ईओडब्ल्यूनेच्या ताब्यात देण्यात आले आहे. एकता कपूरच्या ‘कुसुम’ या मालिकेतून अनुज सक्सेनाने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कुसुम या मालिकेत अनुज सक्सेनाने अभय कपूर हि व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर त्याने कुमकुम, कुछ पल साथ तुम्हारा, सारा आकाश या मालिकांमध्ये काम केले होते.