कोल्हापूर प्रतिनिधी । संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही. अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफीवर दिली आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. तसेच सरकार २१ हजार कोटींची कर्जमाफी करत असल्याचा दावाही खोटा असून कर्जमाफीची यादी जाहीर केल्यास सरकार उघडे पडेल अशी टीकाही माजी खासदार राजु शेट्टी यांनी केलीये. ते कोल्हापूरात बोलत होते.
शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान समजले नसल्याची टीकाही त्यांनी केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीवर शेतकरी पूर्णपणे नाराज असल्याचे राजू शेट्टींनी म्हंटल आहे. या कर्जमाफीची एकूण रक्कम 7 ते 8 हजार कोटीच्यावर जाणार नाही. मग ही कर्जमाफी नेमकी कुणासाठी आहे ? असा संतप्त शेट्टी यांनी केला आहे.
राज्यात सर्वाधिक पीककर्ज वाटप करणारे जिल्हे आहेत. त्यामध्ये एकाही जिल्हात ६०० ते ७०० कोटींच्यावर थकबाकी नाहीये. त्यामुळे नेमके कर्जमाफीस पात्र शेतकरी समजू शकत नाहीयेत. त्यामुळे या कर्जमाफीचा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे हे जाहीर करा, म्हणजे नेमकी किती कोटींची कर्जमाफी आहे हे समजू शकेल.असं राजू शेट्टी यांनी म्हंटल आहे.