कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूरातील कसबा बावडा येथील आनंदा करपे या शेतकऱ्याने आज महापालिकेच्या गेटवरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी समयसूचकता दाखवत महापालिका कर्मचाऱ्यांनी तत्काळ शेतकऱ्याला वाचवत ताब्यात घेतलं. टीडीआर स्वरूपातील मोबदला मिळण्यात दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ या शेतकऱ्याने हे पाऊल उचलले. यासंदर्भात त्यांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन तसेच प्रत्यक्ष भेटूनही पाठपुरावा केला होता.
परंतु, त्याची दखल न घेतली गेल्याने कर्जबाजारी झाल्यामुळे आपल्याला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे सांगत आनंद करपे यांनी आज दुपारी महापालिकेत जात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. याच दरम्यान महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होणार असल्याने विठ्ठल रामजी शिंदे चौकात नगरसेवक, कर्मचारी व नागरिक होते. आत्मदहनाचा प्रयत्न होताच महापालिका वर्तुळात खळबळ उडाली.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.