मायणी प्रतिनिधी | महेश जाधव
अनफळे तालुका खटाव येथील मारुती राम आडके वय ७० रा अनफळे यांचा शनिवारी सायंकाळी ८:३० वाजण्यासुमारास सर्पदंशाने मृत्यु झाला असल्याची घटना घडली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार उपचार वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे.त्यामुळे नातेवाईकानी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच वैद्यकीय अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करावा, घरातील कर्ता माणूस दगावल्याने होणारी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत मृतदेह पाच तास मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ठेवला . आरोग्य विभागाचे जिल्हा अधिकारी डॉक्टर विनीत फाळके यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.
शनिवारी सायंकाळी ८ वाजनेच्या सुमारास मारुती आडके यांना राहत्या घराजवळ सर्पदंष झाल्या नंतर त्यांना उपचारासाठी मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणण्यात आले.प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्यामुळे या ठिकाणी असलेल्या आरोग्य सेविकेने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढिल उपचारासाठी वडुज येथील रुग्णालयात जाण्यास सांगितले त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी खाजगी वाहनाने आडके यांना वडुज येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले.मात्र वडूज येथेही डॉक्टर उपलब्ध नसल्याने येथून रुग्णवाहिकेने आडके यांना सातारा जिल्हा रुणालयात दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.
सकाळी आडके यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच अनफळे येथील त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्र मायणी येथे जमा झाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. वितीन फाळके आल्यानंतर मायणी प्राथमिक आरोग्य केंद्र , वडुज ग्रामिण रुग्णालय, मायणी व वडुज येथिल १०८ रुग्णवाहिका यांची चौकशी करुन आठ दिवसात अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात येइल . दोषीवर योग्य कारवाई करण्यांत येइल . तसेच आठ दिवसात मायणीत कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी देण्याची हमी दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.