औरंगाबाद : शेतात काम करत असताना अचानक गाईने लाथ मारल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला घाटी रुग्णालयाच्या ट्रॉमा विभागात दाखल करण्यात आले होते. चार दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आता उपचार सुरू असताना अचानक मृत्यू झाला.
संजय बाबु चव्हाण असे शेतकरी मृताचे नाव आहे. जटवाडा परिसरातील गाव अंधरी तांडा येथे राहत होते. त्याच परिसरात त्यांची शेती होती. आणि गाय देखील होते. 2 जुलै रात्री संजय चव्हाण हे गोठ्यात काम करत होते. काम करताना अचानक त्यांच्या डोक्यात गाईने जोरात लाथ मारली.
त्यानंतर त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात आणि नंतर घाटी रुग्णालयाच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र 6 जुलै रोजी त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. हर्सूल पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.