हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्याला आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून अनेक वेगेवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. यातीलच प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाखांचे कर्ज काढून एका शेतकऱ्याने रोपवाटिकेचा व्यवसाय करून मोठ्या प्रमाणात नफा कमवला आहे. येव्हडच नव्हे तर ही व्यक्ती अनेकांना रोजगार सुद्धा देत आहे. चला जाणून घेऊयात कोण आहे ही व्यक्ती आणि त्यांची संपूर्ण यशोगाथा….
या यशस्वी शेतकऱ्याचे नाव आहे रोरान सिंग… जस मन नावाची त्यांची रोपवाटिका आहे. हा रोपवाटिका व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत बँकेने त्यांना सुरुवातीला १ लाख रुपयांचे कर्ज दिले. यामधून त्यांनी चांगली कमाई केली. रोरान सिंग यांना सुरुवातीलाच मिळालेले यश पाहता बँकेने त्यांना 10 लाख रुपये कर्ज म्हणून दिले. या पैशातून त्यांनी आणखी आपला व्यवसाय वाढवला. रोरान सिंग त्यांच्या रोपवाटिका व्यवसायातून चांगला नफा कमावत आहेत. याशिवाय 10 जणांना ते या माध्यमातून रोजगारही देत आहेत. त्यांच्या या देदीप्यमान यशामुळे ते परिसरातील लोकांमध्ये चांगलेच चर्चेत आहेत.
I got 1 lakh rupees under PM Mudra Yojna, and after seeing my success, the Bank increased the limit to 10 lakh rupees, says Roran Singh, a beneficiary of #PMMudrayojna who gave employment to 10 other people. @FinMinIndia pic.twitter.com/wzgu3PQJ0G
— DD News (@DDNewslive) April 8, 2023
शेतकरी मित्रानो, तुम्हालाही सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता नाही. आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून अवघ्या एका क्लीकवर तुम्ही तुम्हाला हव्या त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च करावा लागणार नाही. या व्यतिरिक्त हॅलो कृषी मध्ये जमीन मोजणी, सातबारा उतारा, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज, यासारख्या सुविधाही अगदी मोफत मध्ये मिळतात. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.
हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click Here
काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना –
देशभरातील तरुणांना स्टार्टअप साठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत, सरकार 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे. या कर्जाची रक्कम ३ श्रेणी मध्ये विभागली आहे. ते म्हणजे शिशू कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्ज … यामधील शिशू कर्जाअंतर्गत तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. किशोर कर्जाअंतर्गत 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. तसेच तरुण कर्जाअंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. या योजनेंतर्गत कर्ज घेतल्यास वर्षाला 9 ते 12 टक्के व्याजदर आहे.