सांगली । राज्याचे माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सदाभाऊ खोत यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली असून ते होम क्वॉरनटाईन झाले आहेत. खुद्द सदाभाऊ खोत यांनी या वृत्ताला दुजोरा देत फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली.
‘माझी कोवीड १९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मी आता उत्तम आहे, व मी क्वॉरनटाईन झालो आहे. तरी आपण आपली व आपल्या कुटंबाची काळजी घ्या. गणेशरायाच्या व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन’ अशी फेसबुक पोस्ट लिहून सदाभाऊ खोत यांनी करोनाची लागणी झाल्याची माहिती दिली.
https://www.facebook.com/sadabhaukhot/posts/1764331323705209
सदाभाऊ खोत हे करोना काळातही सक्रियपणे काम करत होते. सांगली येथे रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनताही ते सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वी इस्लामपूर येथे जिल्हा कोविड रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत सदाभाऊ खोत ही उपस्थित होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”