किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणुक मदन भोसलेंनी लढवू नये – साजिद मुल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड येथील शेतकरी संघटनेचे नेते साजिद मुल्ला यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. “मदन भोसले यांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे कारखाना अडचणीत आला असून साखर आयुक्तांनी कारवाई केली. भोसले यांनी निवडणूक न लढवता जो कारखाना चांगल्या पध्दतीने चालवेल त्यांच्या पाठीशी उभे राहावे अन्यथा कारखाना राजकीय अड्डा बनेल, असे शेतकरी नेते साजिद मुल्ला यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

शेतकरी नेते साजिद मुल्ला यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, किसनवीर सहकारी साखर कारखाना हा मदन भोसले यांच्याकडे काही वर्षे आहे. सुरूवातीच्या काळात कारखाना हा बरा चालला नंतर या कारखान्याने दोन युनिट चालवायला घेतले. त्यामुळे किसन वीर कारखान्याचे नियोजन कोलमडले. एक दोन वर्षाची उस बिले मदन भोसले यांनी अद्याप ही शेतकऱ्यांना दिली नाहीत. दोन दोन वर्षे ऊस सांभळावा लागतो. यावेळी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस घातला आहे पण वर्ष झाले पण शेतकऱ्यांना अजूनही बिले कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना दिली नाहीत.

अशात अवस्थेतच किसनवीरची निवडणूकीची रणधुमाळी चालू झाली आहे. अनेक जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. शेतकऱ्यांमधून प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. मदन भोसले यांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे कारखाना अडचणीत आला आहे. साखर आयुक्त यांनी कारवाई केली मदन भोसले यांनी निवडणूक न लढवता जो कारखाना चांगल्या पध्दतीने चालवेल त्यांच्या पाठीशी उभे राहावे. अन्यथा, कारखाना राजकीय अड्डा बनेल, असे शेतकरी नेते साजिद मुल्ला यांनी म्हटले आहे.

Leave a Comment