मनसे ही भाजपची ‘सी टीम’; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील जाहीर सभेत शिवसेना आणि ठाकरे सरकार वर जोरदार टीका केल्यानंतर शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर देत मनसे ही भाजपची सी टीम आहे असा टोला लगावला आहे. साम टीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मनसेवर पलटवार केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, मनसेचे राजकारण हे टाईमपास राजकारण आहे. तसंच टाइमपास टोळीला काम मिळालं हे पाहून बरं वाटलं असा टोलाही लगावला. मनसे ही भाजपची सी टीम आहे. कारण एमआयएम ही भाजपची बी टीम आहे अस आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं याचा विचार केला पाहिजे असंही ते म्हणाले.

दरम्यान, जनतेला दिलेली वचने पूर्ण करणे आणि त्यांची सेवा करणे हेच आमचे हिंदुत्व आहे. भाजप मात्र आपल्या सत्तेसाठी इतर पक्षांना वापरून घेतो. प्रक्षोभक बोलून, हिंदू-मुस्लीम दंगे करून तसेच वाद घडवून भारतीय जनता पक्ष सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत असतो अस म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवरही हल्लाबोल केला.