दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचे तर्कट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना । केंद्रातील मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरुद्ध राजधानी दिल्लीत गेल्या १३ दिवसांपासून पंजाब, हरयाणातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. देशातील इतर राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एकीकडे हे आंदोलन तीव्र होत असतानाच दुसरीकडे भाजपचेच नेते या आंदोलनावर टीका- टिप्पणी करताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी तर या आंदोलनाचा संबंध थेट बाहेरील देशांशी जोडून नवा वाद ओढवून घेतला आहे.

‘हे शेतकऱ्यांचं आंदोलन नसून या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. पहिल्यांदाच देशातील मुस्लिम समाजाला भरकटवलं आणि सीएए आणि एनसीआरमुळं मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल, असं सांगितलं. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?’ असा सवाल दानवेंनी केला.’हा बाहेरच्या देशानं रचलेला कट आहे. शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहे. आपल्या देशआतील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,’ असंआवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर व भाजपचे स्थानिक नेते केशव घोळके यांनीही शेतकरी आंदोलनाचा संबंध चीन आणि पाकिस्तानसोबत जोडला होता. तसंच, शेतकरी आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानमधून फंडिंग होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

Leave a Comment