परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
दुष्काळी परिस्थितीमुळ निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडावी व त्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी प्रशासनाला निवेदन पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नसल्याने पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी गोदावरी नदीतील जलाशयात जलसमाधी आंदोलन केले.
जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यात बँकांची वसुली, पिक विमा जिल्ह्यातील शेत रस्ते, रस्ते व तारू गव्हाण बंधाऱ्या शेजारील पाण्याअभावी १८ गावातील पाणीप्रश्न या व इतर पंधरा मागण्यांसाठी भाकप च्या वतीने २० फेब्रुवारी रोजी पाथरी तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
गुरुवार दि.५ मार्च रोजी दुपारी एक वाजता पन्नास ते साठ ढालेगाव बंधाऱ्या खाली गोदावरी नदी पात्रात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. यावेळी यावेळी पाथरी तहसीलदार कांगणे यांनी मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत काढली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात वरिष्ठांना लेखी कळवण्यात येईल व मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान आंदोलन स्थळे अग्निशामक बंब व आपत्कालीन यंत्रणेसह पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.