याला म्हणतात प्रेम! शेतकऱ्यानं केला लाडक्या बैलाचा धुमधडाक्यात वाढदिवस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

हौसेला मोल नसतं असं म्हणतात. होय खरंच हौसेला मोल नसतं हे करून दाखवलं आहे कराड तालुक्यातील गोवारे येथील शेतकरी सर्जेराव यादव बुवा यांनी. या शेतकऱ्याने आपला तुक्या खोंडचा पहिला वाढदिवस अगदी धुमधडाक्यात फटाक्यांची आतिषबाजी करत केक कापून साजरा केला आहे.

सर्जेराव यादव यांच्याकडे असलेल्या हिंदकेसरी पक्षा या बैलाचा तुकाराम हा खोंड. पण सर्वजण त्याला लाडाने तुक्या असे म्हणतात. आपल्या लाडक्या तुक्याचा धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय सर्जेराव यांनी केला. मग तयारी सुरु झाली तुक्याच्या वाढदिवसाची. वाढदिवसा दिवशी लाडक्या तुक्याला स्वच्छ अशी पाण्याने आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर ऋषिकेश यादव यांनी तुक्याला उत्तमरीत्या सजवले.

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पशूंची खरेदी किंवा विक्री करायची असेल तर आता कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज नाही. Hello Krushi या अँपवर तुम्ही तुमच्या आसपासच्या परिसरातील पशूंची खरेदी करू शकता आणि तुमच्या जनावरांची सुद्धा घरी बसून विक्री करू शकता. त्यामुळे कोणत्याही एजंटच्या मार्फत होणारा अतिरिक्त खर्च वाचणार आहे. विशेष म्हणजे हॅलो कृषी तुम्हाला हि सेवा अगदी मोफत देत आहे. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi हे अँप डाउनलोड करून Install करा. अँप ओपन करताच तुम्हाला प्राणी खरेदी- विक्रीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लीक करताच तुम्हाला हवी असलेली जनावरे, त्यांच्या मालकाचा मोबाईल क्रमांक आणि ठिकाण याबाबत सविस्तर माहिती मिळेल. हॅलो कृषी मध्ये याव्यतिरिक्त रोजचा बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज, तुमच्या आसपासची खत दुकाने, कृषी सेवा केंद्र यांची संपूर्ण माहिती मिळेल. त्यामुळे आजच हॅलो कृषी मोबाइल मध्ये डाउनलोड करा.

हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click Here

तुक्याच्या सुरुवातीला शिंगाना आकर्षक गोंडे बांधण्यात आली. नंतर त्याच्या गळ्यात मस्तपैकी हारही घातला गेला. अंगावर आकर्षक नक्षीची रेखाटली. इतकंच नाही तर ज्या छकड्यातून तुक्या 360 च्या वेगाने पळतो त्या चकड्यालाही आकर्षक अशी सजावट करण्यात आली. यावेळी घरातील महिला सदस्यांनी तुक्याला औक्षण केले. त्यानंतर तुक्याच्या हस्ते खास तयार केलेला केक कापण्यात आला.

यावेळी आकाशात आकर्षक अशी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. यावेळी तुक्याला त्याच्या लाडक्या प्रेमिकांनी व घरातील सदस्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. एक प्रगतिशील शेतकरी सर्जेराव यादव यांनी आपल्या लाडक्या तुक्याचा खोंडाचा मोठ्या धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या वाढदिवसाची चांगलीच चर्चा पंचक्रोशीत होत आहे.

तुक्याचा पळ भल्या भल्यांच्या हृदयांचा ठोका चुकवतो

एकादशी दिवशी तुकाराम अर्थात तुक्या याचा वाढदिवस साजरा होणे हा एक अपूर्व योगायोगच. जन्माला आल्यानंतर सातव्या दिवशी पासून या खोंडाने पळायला सुरुवात केली. आजपर्यंत याने आपल्या बापा (हिंदकेसरी पक्षा) सोबत शर्यतीत भाग घेतला आहे. तुक्याचा पळ भल्या भल्यांच्या हृदयांचा ठोका चुकवतो. सर्जेराव यादव यांनी या खोंडाला जीवापाड जपले असून तो खोंड लवकरच शर्यत प्रेमींमध्ये नावारूपाला येईल, असे त्यांनी सांगितले.