औरंगाबाद | बँकने कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याने बँकेतच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील विहा मांडवा या गावी घडली आहे. मधुकर अहिर असे आत्महत्त्येचा प्रयत्न करणार्या शेतकऱ्याचे नाव असून त्याने मांडवा गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला ५० हजार रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. गेल्या वर्षी या शेतकऱ्याचे बोन्ड आळीच्या प्रादुर्भावामुळे नुसकान झाले होते. या वर्षी त्याला बँकेने कर्ज देण्यास नकार दिल्याने त्याने हा प्रकार केला आहे.
दरम्यान, ‘५० हजारांचे कर्ज मागणे हे अवास्तव होते. मागील वर्षीच्या कर्जाची रक्कम फेडण्यात हे शेतकरी अपयशी ठरले असतानासुद्धा आम्ही त्यांना आज २० हजार रुपयांचे कर्ज देणार होतो. तसेच त्यातील ४ हजार मागील वर्षीच्या कर्जाचे व्याज म्हणून कापून घेणार होतो. तरीही या शेतकऱ्याने असे पाऊल उचलले’ असे संबंधित बँक अधिकाऱ्याने सांगितले आहे. कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेच्या दारात आत्महत्येची वेळ येणे हे दैनिय गोष्ट आहे. मधुकर अहिर यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.