सातारा | आले या पिकाला पाच टनांला पाच ते सहा हजार रूपये दर मिळत असल्याने उत्पादक अडचणीत सापडले आहेत. एका गाडीला पाच ते सहा हजार रूपये दराने विक्री करावी लागत आहे. या दरातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वर्षभर केलेली भांडवली गुंतवणूकही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
सातारा जिल्ह्यात सातारी व औरंगाबादी आल्याची लागण मागील हंगामात विक्रमी झाली होती. दोन वर्षांपूर्वीच्या विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आल्याची लागण केली होती. त्या हंगामात ५० ते ६० हजार प्रती गाडीला दर मिळाल्याने मोठ्या आशेने व मोठी भांडवली गुंतवणूक करून जिल्ह्यात कमी- जास्त प्रमाणात सर्व शेतकऱ्यांनी आल्याची लागण केली. त्यात सातारा तालुक्यातील नागठाणे, निनाम पाडळी, शेंद्रे, भाटमरळी या भागांत मोठ्या प्रमाणात आल्याची लागण झाली होती. तसेच कोरेगाव, खटाव, खंडाळा, वाई तालुक्यांतही आल्याची लागण झाली. शेतकऱ्यांनी बेडवर किंवा सरी पद्धतीने लागण केली. वर्षभर त्या पिकांची निगा राखली. शेण खत व सेंद्रिय खतांच्या मात्रा देऊन अत्यंत चांगल्या पद्धतीची पिके तयार केली. पण सध्या गाडीला पाच ते सहा हजार रुपये गाडी या दराने आल्याची विक्री करावी लागत आहे. त्यातून वर्षभर केलेली भांडवली गुंतवणूकही पदरी पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
सातारा जिल्ह्यात सातारी व औरंगाबादी आल्याची लागण मागील हंगामात विक्रमी झाली होती. दोन वर्षांपूर्वीच्या विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आल्याची लागण केली होती. त्या हंगामात ५० ते ६० हजार प्रती गाडी दर मिळाल्याने मोठ्या आशेने व मोठी भांडवली गुंतवणूक करून जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात सर्व शेतकऱ्यांनी आल्याची लागण केली. त्यात सातारा तालुक्यातील नागठाणे, निनाम पाडळी, शेंद्रे, भाटमरळी या भागांत मोठ्या प्रमाणात आल्याची लागण झाली होती. तसेच कोरेगाव, खटाव, खंडाळा, वाई तालुक्यांतही आल्याची लागण केली आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून शेतीमध्ये आल्याची हुकमी शेती केली जात आहे. बियात बदल म्हणून औरंगाबादी आल्याची लागण केली जाते. पाण्याचा निचरा होणारी जमीन, शेणखत व सेंद्रिय खताच्या जोरावर काही शेतकऱ्यांनी पाच ते सहा फूट उंचीपर्यंत गादी वाफ्यावर आल्याचे उत्पादन घेतले आहे. आले हे मसाल्याचे पीक असल्याने व आल्यापासून सूंट केला जात असल्याने गेल्या दोन वर्षांत प्रतिगाडी ५० ते ६० हजार रुपये गाडी याप्रमाणे दर मिळाला. एका गाडीत पाच क्विंटल आले असते. इतर पिकांपेक्षा आल्याचे पैसे झाल्याने मागील हंगामात लागवडीत वाढ झाली. एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च केला. पण या हंगामात गाडीला पाच ते सहा हजार रुपये मिळत आहेत. आल्याच्या खांदणीसाठी दोन ते तीन रुपये किलोला मजुरी द्यावी लागत आहे. आले खांदणे, धुणे यासाठी मजुरांची वाणवा आहे.
आले पिकांसाठी शासनाने हमीभाव किंवा विमा संरक्षण द्यावे ः- शेतिमित्र अशोकराव थोरात
आले पीक दर मिळत नसल्याने पीक शेतात उभे ठेवले आहे, हे पीक संवेदनशील आहे. शेतात जास्त काळ जमिनीत ठेवून चालत नाही. तसेच नैसर्गिकरित्या हे पीक नाजूक आहे. अंतर मशागत करावी लागते, मात्र अंतर पीक घेवून चालत नाही. अशावेळी बाजारात दर नसेल, तर ते पीक शेतातून काढून चालत नाही. आले नाशवंत आहे. सध्या सुंटीलाही दर नाही. आले पीकांवर सुंट ही प्रक्रिया सोडली तर काहीच करता येत नाही. त्यामुळे शासनाने हमीभाव ठरवला पाहिजे, तसेच विमा संरक्षण देणे गरजेचे आहे. आता आले पीक तोट्यात आहे. आल्याचा खर्च ४० रूपयांपेक्षा जास्त दर आहे. आल्याला दर कमीत कमी ५० रूपये मिळाला पाहिजे. तरच सध्या शेतकऱ्यांचा कमीत कमी खर्च तरी निघू शकतो, असे शेतिमित्र अशोकराव थोरात यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group