व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

क्या बात..! स्वरा भास्करने स्वीकारली कचरापेटीत सापडलेल्या मुलीची जबाबदारी

मुंबई | सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर ही आपल्या उलट-सुलट ट्विटमुळे अनेकदा चर्चेत असते. अनेकदा ती ट्रॉलर्सच्या निशाण्यावर असते. मात्र सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. स्वरभास्कर ने कचरा पेटी मध्ये सापडलेल्या एका मुलीला दत्तक घेतले आहे. त्यामुळे सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

त्याचं झालं असं की, आपल्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगच्या निमित्ताने स्वरात उत्तर प्रदेश मधील बदायू इथे गेली होती. त्यावेळी तिनं तेथील एका अनाथ आश्रमाला भेट दिली.खरंतर आश्रमाला मदत करण्याच्या हेतूने ती तिथं गेली होती. मात्र एका मुलीकडे पाहून ती अत्यंत भावूक झाली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. कारण ही मुलगी अनाथ आश्रमाच्या संचालिका प्रियंका जोहरी यांना एका कचर्‍याच्या डब्यात सापडली होती. या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय स्वराने घेतला आहे. ही मुलगी पुढील काही काळ अनाथाश्रमात राहील परंतु तिचा संपूर्ण आर्थिक खर्च स्वरा भास्कर उचलणार आहे. अगदी तिच्या पालन-पोषण पासून शिक्षणापर्यंत. ज्या वेळेस ही मुलगी थोडी मोठी होईल त्यावेळेस स्वरा तिला आपल्या घरी घेऊन जाईल.

या आश्रमाच्या संचालिका प्रियंका यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वराला लहान मुले सांभाळण्याचा अनुभव नाही. शिवाय सध्या सर्वत्र कोरोनाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत अनुभव नसलेली व्यक्ती काही महिन्यांच्या मुलीचा सांभाळ करू शकेल का याबाबत सर्वांनाच शंका होती. त्यामुळे स्वरांनो या मुलीला आणखी काही काळ या आश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतलाय. स्वराने आश्रमातील सर्व मुलांच्या शिक्षणासाठी काही आर्थिक मदत देखील केली आहे. तिचे या मुली सोबत चे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून स्वरावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group