औरंगाबाद प्रतिनिधी | जोरदार झालेल्या पावसामुळे अचानकपणे पूर आल्याने पूल खचला दरम्यान अंदाज न आल्याने कार सह त्यामधील दोघेही पुरात वाहून जात असताना परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा नकरता त्या दोन जणांचा जीव वाचविला.तिसगाव जवळील ए.एस.क्लब जवळील ही मध्यरात्रीची थरारक घटना कॅमेरात कैद झाली. विशेष म्हणजे ज्याचा प्राण शेतकऱ्यांनी वाचविला त्याचा वाढदिवस होता. जॉन सक्रिया व वर्गीस सक्रिया (दोन्ही राहणार म्हाडा कॉलोनी,) असे पुरातून वाचविलेल्या दोघांची नावे आहेत.
शहर व आजूबाजूच्या परिसरात काल रात्री जोरदार पासून झाला होता. जॉन्सन कंपनीत काम करणारे जॉन आणि वर्गीस हे दोघेही त्यांच्या (एम.एच.20.ए.टी.6019) या चारचाकी वाहनाने घरी म्हाडा कॉलोनी येथे जात असताना ए.एस.क्लब कडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या छोट्या पुलावर पूर आले आणि काही वेळातच त्या पुलाचा काही भाग पाण्यात वाहून गेल्याने दोघेही चारचाकी सह पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागले. दोघांची आरडाओरडा ऐकताच परिसरात राहणारे बिरजूलला ताराईएवाले, मोहनसिंग सलामपुरे, हे दोघेही धावत आले व त्यांनी लाकडी ओंढे पाण्याच्या प्रहवात फेकले. पाण्याचा जोर वाढतच चालला होता. जॉन ला पोहतायेत न्हवते, आणि वर्गीस दुसऱ्या ठिकाणी वाहून जात होता. जोरदार पाऊस सुरू असा परिस्थितीत भरतसिंग सलामपुरे, रामसिंग सलामपुरे, अमृतसिंग सलामपुरे,लालाचंद सूर्यवंशी, अक्षय सूर्यवंशी, हिरालाल सूर्यवंशी, सुरज सुर्यवंशी या सर्वांनी परिसराला वेढा घातला. त्यामधील एकाने सुमारे एक किलोमीटर धावत जात शेता मधील मोठी दोरी आणली. त्या दोरीच्या साहाय्याने जॉन ला पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्यात आले व वर्गीस हे ओंढक्याच्या साहाय्याने कठड्यावर आले. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
विशेष म्हणजे जॉन चा शनिवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशीच शेतकऱ्यांनी त्यास जीवनदान दिले. दोघांनीही या शेतकऱ्यांचे आभार मानले.