व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांना 20 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक व नाफेड केंद्रांकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत लाल कांद्याची विक्री केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनुदानासाठी २० एप्रिल पूर्वी संबंधित बाजार समितीकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन मनोहर माळी (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था) यांनी केले आहे.

कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक व नाफेड केंद्राकडे 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी या प्रमाणात अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावयाचा असून अर्जासोबत कांदा विक्री पट्टीची मूळ प्रत, कांदा पीक पेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, शेतकऱ्याच्या बँक पासबूकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स (आयएफएससी कोड व खाते क्रमांक तपशीलासह) जोडावयाची आहेत.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला सरकारकडून कोणतेही अनुदान मिळवायचं असेल तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही घसरबसल्या शेतीशी निगडित सर्व योजनांचा आणिअनुदानाचा लाभ घेऊ शकता. महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही. याशिवाय हॅलो कृषी मध्ये तुम्हाला रोजचा बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज, पशूंची थेट खरेदी -विक्री यासारख्या अनेक सुविधा अगदी मोफत मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच मोबाईल मध्ये हॅलो कृषी हे अँप डाउनलोड करा.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

कांदा अनुदान अर्जाचा नमुना कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, शेतकरी, थेट पणन परवानाधारक व नाफेड खरेदी केंद्र येथे निःशुल्क उपलब्ध होईल. शेतकऱ्यास साध्या कागदावर देखील विहीत माहिती नमूद करुन कागदपत्रे जोडून अर्ज करता येईल, असे ही श्री. मनोहर माळी यांनी कळविले आहे.