चिकलठाणा येथे होणाऱ्या क्रीडा संकुलाची शेतकऱ्यांकडून तोडफोड; 8 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | चिकलठाणा येथील शासकीय गायरान जमिनीवर क्रीडा संकुल उभारण्याच्या अगोदर आम्हाला मोबदला द्या किंवा दुसरीकडे जमीन द्या. अशी मागणी सात ते आठ शेतकऱ्यांनी चार दिवसांपूर्वी कोणशीलेची तोडफोड केली आहे. त्याचबरोबर काम करणार्‍या मजुरांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी एमआयडीसी चिकलठाणा येथे घडली.

याप्रकरणी भाऊसाहेब रंगनाथ बर्थडे, प्रकाश बरडे, संजय बाबुराव बरडे, बाबासाहेब लक्ष्मण बरडे, रावसाहेब बाबुराव बरडे, सांडू रंगनाथ राजपूत तुळशीराम तुकाराम गायकवाड आणि बाळू ओंकार बरडे यांच्यावर एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रीडा संकुलाच्या निर्मितीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी 18 मे 2018 रोजी क्रीडा संचालनायास जागेबाबत संमतीपत्र सादर केले होते. त्यानुसार मौजे चिकलठाणा येथील गट क्रमांक 216 मधील 7.07 हेक्टर आणि 217 मधील 7.89 हेक्टर अशी एकत्रित 14.96 हेक्टर गायरान जमीन 1 मार्च 2019 रोजी विद्यमान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी देऊ केली होती.

राज्याच्या क्रीडा धोरणानुसार शहरालगत चिकलठाण्यामध्ये 27 एकर जागेत भव्य जिल्हा क्रीडा संकुल साकारण्यात येणार आहे. यासाठी शासनाने 16 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी 3 कोटी 84 लाख रुपये प्राप्त झालेत. कामाचा भूमीपूजन सोहळा रविवार, 27 जून रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाला होता. पहिल्या टप्प्यात चार कामे करा असे कंत्राटदाराला कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते. चार कामांमध्ये तार कंपाउंड, बहुउद्देशीय बंदिस्त प्रेक्षागृह, पिण्याच्या पाण्याची विहिर आणि पाण्याच्या टाकीचा समावेश करण्यात आला होता. आता जमिनीच्या बदल्यात जमीन द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

संरक्षक भिंत, विविध खेळाची मैदाने, स्केटींग, बास्केटबॉल, मल्टिपर्पज हॉल, जिम हॉल, योगा हॉल, जिम्नॅस्टिक हॉल, टेबल टेनिस हॉल, बॉक्सिंग हॉल, शूटिंग रेंज, धनुर्विद्या, वेटलिफ्टिंग, कुस्ती हॉल, 16 कोर्ट कँटीनसह प्रशस्त बॅडमिंटन हॉल, पाण्याची अंतर्गत सुविधा व टाकी, लॉन टेनिस सिंथेटिक कोर्ट, 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, ड्रेनेज व वॉकिंग पाथवे. अंतर्गत 6 रस्ते, सौरऊर्जा प्रकल्प, विद्युतीकरण, पार्किंग सुविधा शेड त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वार 2, सुरक्षा रक्षकांना प्रशस्त खोल्या, 150 मुला मुलींसाठी वसतिगृह, रेन वॉटर हार्वेस्टिंग या सुविधा असणार आहेत.

Leave a Comment