नवी दिल्ली । FASTag चा दावा आहे की,”भारतातील निवडक पेट्रोल पंपांवर सर्वात वेगवान कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस इंधन भरण्याची सुविधा आहे, ज्यासाठी FASTag ने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनशी भागीदारी केली आहे.” ICICI बँकेशी ज्या युझर्सचे FASTag जोडले गेले आहे त्यांना देशातील इंडियन ऑईलच्या रिटेल आउटलेट्स वर बेनिफिट्सही देण्यात येईल. रविवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले गेले आहे की, “ICICI बँक FASTag युझर्स आता इंडियन ऑइलपेट्रोल पंपांवर संपूर्णपणे डिजिटलाइज्ड अनुभव घेऊ शकतील ज्यामुळे युझर्सचा वेटिंग पिरिअडही कमी होईल.”
इंडियन ऑइल आऊटलेट्सवर अनेक सुविधा उपलब्ध असतील
या निवेदनानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे 3,000 इंडियन ऑईल रिटेल आउटलेट्स संपूर्ण भारतभर व्यापले जातील. ही सिस्टीम इंडियन ऑइलच्या ऑटोमेशन सिस्टमसह काम करेल, जे रिफ्युएलिंग प्रक्रियेदरम्यान कोणत्याही मॅन्युअल हस्तक्षेपास दूर करेल. ही भागीदारी ICICI बँक FASTag च्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल आणि ल्युब्रिकंट्सचे पेमेंट देण्यास परवानगी देते.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, युझर्सना रीफ्युएलिंगच्या वेळी ग्राहक अटेंडंटला कळवावे लागेल, जे नंतर गाड्यांचे FASTag / कार नंबर प्लेट स्कॅन करेल. त्यानंतर ग्राहकांना रीफ्युएलिंगसाठी OTP पाठविला जाईल. POS मशीनमध्ये OTP एंटर केल्यानंतर, ट्रान्सझॅक्शन प्रोसेस पूर्ण केली जाईल.
टोल प्लाझावर कॅशलेस ट्रान्सझॅक्शनसाठी मदत करते
FASTag जे सध्या देशातील राष्ट्रीय महामार्गांवर डिजिटल टोल कलेक्शनसाठी वापरले जाते. टोल कलेक्शनची प्रक्रिया जलद आणि सुलभ करणे आणि टोल प्लाझावरील वेटिंग पिरिअड किंवा लांब रांगा कमी करणे हे FASTag चे उद्दीष्ट आहे. FASTag चे सध्या भारतभरात सुमारे 3.5 कोटी युझर्स आहेत.
FASTags देशभरातील कोणत्याही टोल बूथवर खरेदी करता येतील. FASTag खरेदी करण्यासाठी आपल्या व्हेईकल रजिस्ट्रेशन डाक्यूमेंट्ससह एक आयडी आवश्यक आहे. टोल प्लाझा व्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि पेटीएम पेमेंट्स बँक यासह 22 बँकांमार्फत FASTags खरेदी करता येईल. Paytm, Amazon आणि Flipkart सारख्या काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्यांच्या अॅपद्वारे FASTag ची ऑफर देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group