Fastag News : अपघातानंतर वाहनामध्ये असलेला Fastag सोडू नका, त्यासाठी काय करावे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रस्त्यावरील अपघातात वाहनाचे नुकसान झाल्यानंतर लोकं गाडी तिथेच सोडून देतात किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात पार्क करतात आणि वाहनात बसवलेला FASTag काढत नाहीत. या छोट्याशा निष्काळजीपणामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा प्रकारे, वाहनाच्या FASTag मध्ये असलेले पैसे तुम्हांला काढता येणार नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत वाहनधारकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अशा वाहनात FASTag लावल्याने इतर कोणते नुकसान होऊ शकते ते जाणून घ्या.

अपघातानंतर, लोकं वाहनावर दावा करण्यासाठी औपचारिकता सुरू करतात. गाडी तिथेच सोडतात. त्यात बसवलेला सुद्धा काढत नाही. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर वाहनातून FASTag काढून टाकला पाहिजे, कारण वाहन खराब झाले तर त्याच्या समोरच्या काचेला नक्कीच नुकसान होते. जर कोणतेही नुकसान नसेल तर एक क्रॅक नक्कीच होतो. अशा परिस्थितीत FASTag काढून टाकणे कधीही चांगलेच.

FASTag काढणे का आवश्यक आहे ?
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, फास्टॅग दोन कारणांसाठी काढून टाकणे आवश्यक आहे. पहिले म्हणजे FASTag मध्ये एक छोटी चिप असते. FASTag मधील चिप काच फुटल्यानंतर किंवा तडा गेल्यानंतर खराब होऊ शकते. FASTag वरून ठीक दिसत असला तरी टोलनाक्यावर चिप काम करणार नाही. अशा स्थितीत तुमचे वाहनावर FASTag नाही असे मानले जाईल. यामुळे कदाचित चालकाला दंडही भरावा लागू शकतो.
शकेल.

दुसरे कारण म्हणजे खराब झालेल्या वाहनातून FASTag काढून टाकणे आवश्यक आहे कारण जर तुमच्या FASTag मध्ये बॅलन्स असेल आणि तो दुसर्‍या FASTag वर ट्रान्सफर करायचा असेल तर त्यासाठी जुना FASTag आवश्यक असेल. त्याच्या नंबरवरूनच बॅलन्सचे पैसे नवीन FASTag वर ट्रान्सफर केले जाऊ शकतात. त्यामुळे अपघातानंतर किंवा समोरची काच फुटल्यानंतर FASTag काढणे आवश्यक आहे.

सायबर गुन्हेही घडू शकतात
सायबर एक्सपर्ट रितेश भाटिया सांगतात की,” FASTag फेकणे किंवा कुठेही सोडणे हे काही वेळा हानिकारक ठरू शकते, विशेषत: ते FASTag जे बँक खात्याशी जोडलेले आहेत. अशा FASTag द्वारे सायबर गुन्हेगार देखील आपली फसवणूक करू शकतात.”

Leave a Comment