हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आजपासून सर्व टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वाहनांना फक्त FASTag मधून टोल भरावा लागणार आहे. ज्यांच्याकडे FASTag नाही त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल. एनएचएआयने यापूर्वी 1 जानेवारीपासून टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचा निर्णय दिला होता. नंतर ते दीड महिना वाढवण्यात आले.
मात्र आता FASTag च्या अंमलबजावणी मुदतीला पुढे ढकललं जाणार नाही, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल स्पष्ट केलं. त्यामुळे रविवारी रात्री 12 वाजेपासून सर्व टोल प्लाझावरील कॅशलेन बंद ठेवण्यात येणार आहेत. कोणताही वाद होऊ नये म्हणून टोल प्लाझावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.
जर आपण अद्याप आपल्या वाहनावर FASTag स्टिकर लावले नसेल तर तुम्हाला ते लवकरच लावले पाहिजे. पेटीएम, अॅमेझॉन, स्नॅपडील इत्यादींकडून FASTag खरेदी केलं जाऊ शकतं. तसेच, देशातील 23 बँकांच्या माध्यमातून FASTag उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त रस्ते वाहतूक प्राधिकरण कार्यालयातही FASTag ची विक्री केली जाते. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) त्यांच्या उपकंपनी इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (आयएचएमसीएल) च्या माध्यमातूनही FASTag ची विक्री करते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’