हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात (Car Accident) झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणताही व्यक्ती जखमी झालेला नाही. मात्र, ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळल्यामुळे गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात भुसावळ-यावल रस्त्यावर घडली आहे. या घटनेमुळे काही वेळासाठी रस्त्यावरील वाहतूक सेवा खोळंबली होती. जिला पुन्हा पोलिसांनी सुरळीत केले.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, आज शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. चोपडा येथील सभा आटोपून ते पुन्हा भुसावळकडे निघाले होते. याचवेळी त्यांच्या वाहनाच्या समोर स्पीड ब्रेकर आल्यामुळे वाहन चालकाने वाहनाची गती कमी केली. मात्र याचा अंदाज मागून येणाऱ्या वाहनांना आला नाही. यामुळे ताफ्यातील शेवटी येत असलेल्या एका वाहनाची समोरील वाहनास धडक झाली. या धडकेमुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.
दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची ही घटना घडली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर महाड येथे क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेत सुषमा अंधारेंना आणि कोणत्याही व्यक्तीला दुखापत झालेली नाही.