हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जुन्नर तालुक्यातील वडज धरणाच्या कँनलमध्ये ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्यामुळे एका ऊस कामगाराचा दुदैवी मृत्यू झाला आहे. तसेच, या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर विघ्नहर साखर कारखान्याकडे निघाला होता. मात्र चालकाचा निष्काळजीपणामुळेच वडज धरणाच्या कँनलमध्ये हा ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तसेच, दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी अपघातासाठी ट्रॅक्टर चालकाला जबाबदार धरत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या ऊस कामगाराचे नाव सतिष चव्हाण आहे. तसेच, योगेश पवार,गोपाळ राठोड असे दुखापत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या अपघातामुळे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अपघातानंतर काही वेळासाठी धरणावरील वाहतूक ही विस्कळीत झाली होती. जिला पोलिसांनी घटनास्थळी येऊन पुन्हा सुरळीत केले.