मुंबई- पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात; 7-8 गाड्या एकमेकांवर आदळल्या

Accident News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकामागून एक अपघाताची मालिका सुरू असून आज मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर विचित्र पण भीषण अपघात पाहायला मिळाला. खोपोली जवळ हा अपघात झाला असून यावेळी 7 ते 8 गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत.

या भीषण अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. अद्याप मृत्यू कोणी झाला आहे की नाही याबाबत माहिती समोर आली नाही. मात्र या अपघाताचा video समोर आला असून यामध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत.

या अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ थांबवण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस आणि अम्ब्युलन्स दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.