हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन – गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास मुंबईतल्या वरळी सी लिंकच्या टोल नाक्यावर भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये तिघांचा जागीस मृत्यू झाला आहे, तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत झालेल्या व्यक्तींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. हा अपघात वरळी सी टोलनाक्यावर उभ्या असलेल्या सहा ते सात वाहनांना मागून भरधाव कारने जोरदार धडक दिल्यामुळे घडला आहे. सध्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.
या अपघातामुळे वरळी सी लिंकवर काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. परंतु पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी व्यवस्थितरित्या परिस्थिती हाताळत इतर वाहनांना जाण्यासाठी मार्ग मोकळा केला. तसेच तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वरळी सी लिंकच्या टोल नाक्यावर 6 गाड्या उभ्या होत्या. या गाड्यांना भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा कारने धडक दिली. ज्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले. यातील 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
वांद्रे वरळी सी लिंकवर भीषण अपघात, कारचालकाने ६ ते ७ वाहनांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी #Mumbai #Worali #accident #Police #MumbaiPolice pic.twitter.com/wKlsWJyyxC
— Satish Daud Patil (@Satish_Daud) November 10, 2023
दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हा कारच्या चालकाला वेग नियंत्रित करता आला नाही. ज्यामुळे रात्री हा भीषण अपघात घडला. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये इनोव्हा कारच्या चालकाचा ही समावेश आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांकडून कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरे तर, यापूर्वी देखील वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात 5 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर तब्बल 12 जण गंभीर जखमी झाले होते.