लातूरमध्ये भीषण अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू

0
63
Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये जिल्ह्यातील शिवणी- पेठ येथून लातूरकडे मुलीला शाळेत सोडण्यासाठी मोटरसायकलवर येणाऱ्या बाप-लेकीला हायवाने चिरडले आहे. हि घटना बाभलगाव नाका परिसरामध्ये घडली आहे. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
शिवणी- पेठ येथील रहिवासी असलेले शिक्षक दत्तात्रय कोंडीबा पांचाळ आणि प्रतीक्षा दत्तात्रय पांचाळ हे दोघेजण लातूरमधील जिजामाता विद्यालयात आपल्या मोटारसायकलवरून निघाले होते. यादरम्यान लातूर शहरानजीक म्हाडा कॉलनी, बाभळगाव नाका परिसरात त्यांच्या मोटारसायकलला भरधाव हायवा वाहनाने चिरडले.

या भीषण अपघातात बाप लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रतीक्षा ही इयत्ता आठवीत शिकत होती. वडील दत्तात्रय कोंडीबा पांचाळ हे तिला शाळेत सोडण्यासाठी येत होते. मृत दत्तात्रय कोंडीबा पांचाळ हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. या अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांकडून हायवा चालकाचा शोध घेण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here