संतापजनक ! बापाने केले पोटच्या मुलीसोबत ‘हे’ धक्कादायक कृत्य

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दिवसेंदिवस महिलांच्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना नवी मुंबईच्या नेरुळ या ठिकाणी घडली आहे. यामध्ये स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बापानेच अत्याचार (Rape) केला आहे. याप्रकरणी मंगळवारी नेरुळ पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नराधम बाप हा एका व्यावसायिकाच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करत होता. त्या ठिकाणी त्याने आपल्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Rape) केले.

42 वर्षीय नराधम बाप स्वयंपाकी म्हणून एका व्यावसायिकाच्या घरी काम करायचा. तो झारखंड राज्यातील रहिवासी आहे. तो ज्या ठिकाणी काम करत होता त्याच ठिकाणी तो राहत होता. त्याने आपल्या 15 वर्षीय मुलीला आपल्या सोबत नेरुळ या ठिकाणी आणले. यानंतर नेरुळ येथे राहणाऱ्या व्यावसायिकाच्या घरातच त्याने आपल्या मुलीसोबत हे धक्कादायक कृत्य (Rape) केले.

मंगळवारी पहाटेच्या सुमारास हि घटना घडली. यानंतर पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या मालकिणीला सांगितला त्यानंतर हि घटना उघडकीस आली आहे. यानंतर मालकिणीने या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर नेरुळ पोलिसांनी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती नराधम बापाला समजताच तो फरार झाला आहे. नेरुळ पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल