धक्कादायक ! जन्मदात्यानेच दोन्ही मुलांवर केला गोळीबार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये हा गोळीबार झाला आहे. हा गोळीबारात जन्मदात्या पित्याने आपल्या मुलांवर गोळीबार केला आहे. हा गोळीबार निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी केला आहे.

भगवान पाटील यांनी मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली आहे. यामध्ये एक मुलगा विजय याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत तर दुसरा मुलगा सुजयला गोळी घासून गेली आहे. विजय याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर ऐरोलीच्या इंद्रावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या गोळी झाडणाऱ्या पित्याला पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अजून समजू शकले नाही.

Leave a Comment