8 वर्षांची असल्यापासून वडील लैंगिक शोषण करायचे; भाजप नेत्या खुशबू सुंदर यांचा धक्कादायक खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी लहान असल्यापासून म्हणजे वयाच्या 8 व्या वर्षांपासून माझ्या वडिलांनी माझं लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली होती असा धक्कादायक खुलासा भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी केला आहे. खुशबू सुंदर यांनी अलीकडेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन सदस्या म्हणून पदभार स्वीकारला आहे. यूट्यूब चॅनेल मोजो स्टोरीसाठी ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांच्याशी नुकत्याच झालेल्या संभाषणात, खुशबू सुंदरने तिच्या त्रासदायक बालपणाबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

यावेळी त्या म्हणाल्या, मला वाटतं जेव्हा एखाद्या लहान मुलावर किंवा मुलीवर अत्याचार होतो, तेव्हा त्यांना आयुष्यभर जखमा होतात. माझे वडील एक असे पुरुष होते ज्यांना आपल्या पत्नी आणि मुलांना मारहाण करणे, आपल्या एकुलत्या एक मुलीवर लैंगिक अत्याचार करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असं वाटायचं. माझ्यावर जेव्हा पहिल्यांदा अत्याचार झाला तेव्हा मी फक्त 8 वर्षाची होते आणि जेव्हा मी 15 वर्षांची झाले तेव्हा त्यांच्याविरोधात बोलण्याचे धैर्य माझ्यात निर्माण झाले.

त्या पुढे म्हणाल्या, मला भीती वाटत होती की माझी आई माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. माझा पती परमेश्वर आहे ही मानसिकता असलेल्या वातावरणात मी तिला पाहिले आहे. परंतु एकवेळ अशी आलीच की मला वाटलं आता बस, खूप झालं. यानंतर मी माझ्या वडिलांविरोधात बोलू लागले. मी 16 वर्षांचीही नव्हते, तेव्हा ते आम्हाला सोडून गेले. तेव्हा आम्हाला हेही माहिती नव्हतं, की आमचं पुढचं जेवण कुठून येणार आहे अशा शब्दांत खुशबू सुंदर यांनी आपल्यावरील संकट सांगितलं.

कोण आहेत खुशबू सुंदर

खुशबू सुंदर या साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटातून केली होती. मात्र, नंतर 2010 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आधी त्या काँग्रेस मध्ये होत्या मात्र २०२०मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. नुकतीच खुशबू सुंदर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.