चारित्र्याच्या संशयावरून आई-वडिलांमध्ये कडाक्याचे भांडण, मध्ये पडलेल्या मुलीला वडिलांनी रॉकेल टाकून पेटवले

0
52
Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायपूर : वृत्तसंस्था – रायपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पती-पत्नीमध्ये झालेल्या कडाक्याच्या भांडणामध्ये पोटच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. निर्दयी बापाने मुलीवर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले आहे. आरोपीविरोधात पोलिसांनी कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना पोटिया कला या ठिकाणी घडली आहे.

आरोपी पती हा आपल्या पत्नीवर सतत संशय घेत होता. त्यावरून त्यांच्यात सतत वाद होत होता. याच वादातून त्यांच्यात हाणामारी झाली. यादरम्यान आई-वडिलांचे सुरू असलेले भांडण पाहून सहावीत शिकणारी मुलगी भांडण सोडवण्यासाठी त्यांच्या मध्ये पडली. हि गोष्ट संतापलेल्या वडील तीरथ पटेल याला आवडले नाही. त्याने जवळच असलेली रॉकेलची बाटली तिच्यावर ओतली आणि तिला पेटवून दिले.

यामध्ये पीडित मुलगी ८० टक्के भाजली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गंभीररीत्या भाजलेल्या मुलीला पोलिसांनी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. पुलगाव पोलिसांनी कारवाई करून आरोपी वडील तीरथ पटेल याला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here