FD Interest Rates : ‘या’ 2 बँकांमध्ये FD केल्यास मिळतात सुपर रिटर्न्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (FD Interest Rates) गेल्या काही काळात गुंतवणुकीकडे लोकांचा चांगलाच कल वाढला आहे. प्रत्येकजण भविष्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीच्या माध्यमातून आर्थिक पुलाची बांधणी करत आहे. देशभरात गुंतवणुकीचा उत्तम, सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा पर्याय म्हणून बँक FD ला पसंती दिली जाते. आज एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांची संख्या बरीच मोठी आहे. अशातच जर तुम्ही देखील एफडीमध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर समजा ही बातमी तुमच्याचसाठी आहे.

आज आपण अशा एका एफडीबद्दल माहिती घेत आहोत ज्यामध्ये गुंतवणूक करून सुरक्षेची हमी आणि त्यासह उत्तम परतावा कमावणे अगदी सोप्पे आहे. मुख्य म्हणजे मुदत ठेवी गुंतवणुकीतील सर्वात सुरक्षित माध्यम आहे. यातच जर तुम्हाला सुरक्षा आणि उत्तम परतावा मिळणार असेल तर ‘सोने पे सुहागा’. (FD Interest Rates) आजच्या घडीला आपल्या गुंतवणुकीतील रकमेची सुरक्षा आणि त्यावर चांगले रिटर्न्स कुणाला नको असतात? दरम्यान, आज आपण अशा दोन बँकांविषयी जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला मुदत ठेवींवर जबरदस्त परतावा देत आहेत.

ॲक्सिस बँक (Axis Bank)

ॲक्सिस बँक ही कायमच आपल्या ग्राहकांच्या सोयी सुविधांचा विचार करत असते. अशातच ५ फेब्रुवारी २०२४ पासून ॲक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मुदत ठेवींच्या व्याजदरांत सुधारणा केली आहे. (FD Interest Rates) हे सुधारित दर २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर लागू करण्यात आले आहेत. ज्याच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांना ॲक्सिस बँकेतील मुदत ठेवींवर ७.२०% पर्यंत अधिकाधिक व्याज मिळू शकते. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.८५% इथपर्यंत व्याज मिळू शकते. महत्वाचे असे की, ॲक्सिस बँक ही ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना ४.८% ते ७.८५% इथपर्यंत व्याज देत आहेत.

एचडीएफसी बँक (HDFC Bank)

एचडीएफसी बँकेनेदेखील आपल्या ग्राहकांसाठी व्याजदरांत विशेष सुधारणा केली आहे. यात घरगुती, एनआरओ, एनआरई ग्राहकांसाठी एचडीएफसी बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि ५ कोटी रुपयांपर्यंतच्या मोठ्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केल्याचे समजत आहे. हे नवे दर ३ फेब्रुवारी २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत.

(FD Interest Rates) दरम्यान, एचडीएफसी बँक ही सामान्य ग्राहकांना ४.७५% ते ७.४०% इतके व्याज देत आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना ५.२५% ते ७.९०% इतके व्याज दिले जात आहे. मुख्य म्हणजे, यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवरील मानक दरापेक्षा ५० बेसिस पॉइंट अधिक व्याज दिले जात आहे.