हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँका आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांनी (NBFCs) आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सच्या व्याजदरातही वाढ केली आहे. NBFC बजाज फायनान्सनेही पुन्हा एकदा आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सच्या व्याजदरात वाढ केली आहे. बजाज फायनान्सच्या एफडीला क्रिसिल आणि आयसीआरएचे ट्रिपल ए रेटिंग आहे.
एका मीडिया रिपोर्ट नुसार, बजाज फायनान्स कडून मे महिन्यातही एफडी वरील व्याजदर वाढवण्यात आले होते. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी RBI कडून रेपो दरात दोन वेळा 90 बेस पॉईंटची वाढ केली गेली आहे. ज्यामुळे आता रेपो दर 4.9 टक्क्यांवर गेला आहे. बजाज फायनान्सने आता 5 कोटी रुपयांपर्यंतच्या आणि विविध मुदतीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सच्या व्याजदरात 30 ते 45 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. हे नवीन व्याजदर 1 जुलैपासून लागू होणार आहेत. FD Rates
आता ग्राहकांना बजाज फायनान्स 12 ते 23 महिन्यांच्या एकरकमी व्याजदरासह FD वर 5.75 ऐवजी 6.2 टक्के व्याज देईल. त्याच वेळी, 1 जुलैपासून त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पेआउट पर्यायासह नॉन क्यूमुलेटिव्ह एफडीवर अनुक्रमे 6.25 टक्के, 6.3 टक्के आणि 6.4 टक्के व्याज दर मिळेल. एकरकमी व्याजदरासह 44 महिन्यांच्या FD वरील व्याजदर देखील 7.2 टक्क्यांवरून 7.5 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी 44 महिन्यांच्या नॉन-क्युम्युलेटिव्ह वार्षिक व्याज पेआउट असलेल्या एफडीवर आता 7.5 टक्के व्याज मिळेल. FD Rates
हे लक्षात घ्या कि आता ज्येष्ठ नागरिकांना सर्व FD वर जास्त व्याज मिळेल. बजाज फायनान्स कडून 12 ते 23 महिन्यांत एकरकमी व्याजदरासह FD वर वार्षिक 6.45 टक्के व्याज दर दिला जाईल. तसेच 44 महिन्यांच्या क्यूमुलेटिव्ह स्पेशल FD वर आता ग्राहकांना 7.75 टक्के दराने व्याज दिले जाईल. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.bajajfinserv.in/fixed-deposit-fees-and-interest-rates
हे पण वाचा :
Ration Card आधारशी लिंक करण्याची आज शेवटची संधी, लिंक करण्याची प्रक्रिया तपासा
Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन दर पहा
UPI ट्रान्सझॅक्शन मध्ये झाली वाढ, त्याद्वारे पैसे कसे पाठवायचे ते पहा
Sachin Tendulkar : 15 वर्षांनंतरही अबाधित आहे सचिनचा ‘हा’ विक्रम !!!
Credit Card चे लिमिट वाढवण्याचे फायदे आणि तोटे समजून घ्या