हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : फिक्स्ड डिपॉझिट आपले उत्पन्न वाढवण्यासाठीचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. यामध्ये कमी जोखमी बरोबरच गॅरेंटेड रिटर्न देखील मिळतील. ज्येष्ठ नागरिक हे FD चे सर्वात मोठे लाभार्थी आहेत. अनेक बँका, NBFC (नॉन-बँकिंग वित्तीय संस्था) आणि इतर वित्तीय संस्थाकडून नागरिकांना FD वर आकर्षक व्याजदर मिळत आहे.
NBFC बजाज फायनान्स स्पेशल एफडी स्कीममध्ये चांगले व्याज दिले जाते. यामध्ये 60 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांना 7.2% तर 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 7.45% दराने (FD Rates) व्याज मिळते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त व्याज
या संबंधीची माहिती देताना NBFC ने सांगितले कि,”बजाज फायनान्स 60 वर्षांखालील नागरिकांसाठी 7.20% p.a आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.45% p.a. दराने आकर्षक व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या डिपॉझिट्सवर वार्षिक 0.25% पर्यंत अतिरिक्त व्याज (FD Rates) दिले जाईल.”
या स्पेशल FD योजनेअंतर्गत बजाज फायनान्सकडून 15 महिन्यांमध्ये मॅच्युर होणाऱ्या FD साठी 6%, 18 महिन्यांमध्ये 6.10%, 22 महिन्यांमध्ये 6.25%, 30 महिन्यांमध्ये 6.50%, 33 महिन्यांमध्ये 6.75% आणि 44 महिन्यांमध्ये मॅच्युर होणाऱ्या FD साठी 7.20% वार्षिक व्याजदराची ऑफर दिली जाते. तर दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांना 15 महिन्यांमध्ये मॅच्युर होणाऱ्या FD साठी मॅच्युरिटीवर 6.25%, 18 महिन्यांमध्ये 6.35%, 22 महिन्यांमध्ये 6.50%, 30 महिन्यांमध्ये 6.75%, 33 महिन्यांमध्ये 7% आणि 44 महिन्यांमध्ये मॅच्युर होणाऱ्या FD 7.45% वार्षिक व्याजदर मिळतो. FD Rates
मात्र इथे हि गोष्ट लक्षात घ्या कि, ग्राहकांसाठी देण्यात येणारे हे व्याज दर 15,000 ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्ससाठी आहेत. तसेच बजाज फायनान्स कडून 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी 12-23 महिने मुदतीच्या FD वर 5.63% ते 5.75% च्या व्याज दराची ऑफर मिळते. तसेच बजाज फायनान्स 24-35 महिन्यांमध्ये 6.22% ते 6.40% व्याज दर आणि 36-60 महिन्यांच्या मुदतीच्या FD वर 6.82% ते 7% पर्यंतचा व्याजदर देते. FD Rates
ज्येष्ठ नागरिकांना सामान्य FD मध्ये 12-23 महिन्यांच्या मॅच्युरिटीवर 6%, 24-35 महिन्यांच्या मॅच्युरिटीवर 6.65% आणि 36-60 महिन्यांत सर्वाधिक 7.25 टक्के व्याजदर दिला जातो आहे. याशिवाय, नॉन-क्युम्युलेटिव्ह व्याजदराबाबत बोलायचे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 2-23 महिन्यांत 5.84% ते 6% FD, 24-35 महिन्यांत 6.46% ते 6.65% आणि 36-60 महिन्यांत 7.02% ते 7.25% पर्यंत उपलब्ध आहे. FD Rates
अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bajajfinserv.in/fixed-deposit-fees-and-interest-rates
हे पण वाचा :
Inflation : होम लोनपासून ते इन्शुरन्सपर्यंत जूनमध्ये ‘या’ गोष्टींसाठी मोजावे लागणार जास्त पैसे !!!
Aadhar Card चा गैरवापर टाळण्यासाठी वापरा ‘या’ पद्धती !!!
Interest Rates : आता ‘या’ फायनान्स कंपनीकडून आपल्या FD वरील व्याजदरात वाढ !!!
आता घरबसल्या PAN Card वरील फोटो कसा बदलावा हे समजून घ्या !!!
कोण शरद पवार? 82 वर्षात त्यांना अहिल्याबाईंची आज जयंती दिसली काय?; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल