व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कोण शरद पवार? 82 वर्षात त्यांना अहिल्याबाईंची आज जयंती दिसली काय?; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त चौंडी येथे अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. यावेळी आक्रमक झालेल्या पडळकर व खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व रोहित वार यांच्यावर हल्लाबोल केला. “कोण शरद पवार? त्यांचे वय आज 82-83 वर्षे आहे. इतक्या वर्षात त्यांना अहिल्याबाई होळकर यांची जयंती दिसली नाही का? आज कसे या ठिकाणी आले. आजोबा आणि नातूंकडून एक प्रकारचे षडयंत्र रचले जात आहेत. पवारांना कसली भीती वाटत आहे कि आम्हाला अहिल्याबाईंना भिवादन करण्यापासून आम्हाला रोखत आहेत, अशी टीका पडळकर यांनी केली.

गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार यांच्याकडून प्रश्नच गैरवापर केला जात आहे. आणि प्रशासनही त्यांच्या दबावाखाली काम करत आहे. आम्ही चौंडी येथे येत असल्यामुळे पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. माझे शरद पवार यांना खुलले आव्हान आहे की, त्यांनी त्यांची व माझी सभा समोरासमोर लावावी.

आमच्यासारखी पोर चौंडी येथे येऊन तयार झाली. या प्रस्थापितांच्या विरोधात बोलायला लागली आहेत. हे पवार व त्यांच्या नातवाने ओळखलं आहे. हे चळवळीचे केंद्र ताब्यात घेतले पाहिजे. आम्ही अहिल्याबाईंचे प्रेरणास्थान ताब्यात घेतले पाहिजे. म्हणजे गोरगरीबांची जागृती होणार नाही. आंही आपल्याविरोधात हि चळवळ होत आहे ती दाबली जाईल. अशा पद्धतीचे षडयंत्र पवारांकडून रचले जात आहे. मात्र, पवारांनी याद राखावे हि पोर तुमच्या छाताडावर बसून नाचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पडळकर यांनी दिला.