हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. चला तर मग देशातील कोणत्या बँका FD वर सर्वाधिक व्याजदर देत आहेत ते जाणून घेउयात…
SBI
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयकडून या आठवड्याच्या सुरुवातीलाच FD वरील व्याजदरात सुमारे 0.25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीच्या FD वर लागू होतील. हे नवीन व्याजदर 13 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. यानंतर बँक आता 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर सामान्य नागरिकांना 6.75% व्याज तर ज्येष्ठ नागरिकांना 7.25 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. हे लक्षात घ्या कि, बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दर मिळेल. FD Rates
ICICI Bank
खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने देखील रेपो दरातील वाढीचा ग्राहकांना फायदा दिला आहे. आता बँकेकडून 290 दिवसांपेक्षा जास्त आणि 1 वर्षापेक्षा कमी मुदतीच्या FD वरील व्याजदर 5.75 टक्क्यांनी वाढवला आहे. त्याचबरोबर आता बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दर देईल. FD Rates
HDFC Bank
खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने 14 डिसेंबरपासून नवीन दर लागू केले आहेत. आता बँक 15 ते 18 महिन्यांच्या FD वर 7% पर्यंत व्याज देत आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना कमाल 7.75% व्याज देत आहे. बँकेच्या 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसह FD ऑफर करते. FD Rates
Jana Small Finance Bank
जन स्मॉल फायनान्स बँकेकडून सध्या 2-3 वर्षांच्या FD वर सामान्य लोकांना 7.85 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.80 टक्के व्याज दिले जात आहे. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीच्या FD वर लागू होतील. बँकेचे हे नवीन व्याजदर 15 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. FD Rates
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.janabank.com/deposits/regular-fixed-deposit/
हे पण वाचा :
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
आपल्यालाही SBI खात्यातून पैसे कट झाल्याचा एसएमएस मिळाला आहे ??? जाणून घ्या यामागील कारण
Post Office च्या स्कीममध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून मिळवा 51 लाख रुपये
Business Idea : ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरु करून अशा प्रकारे दरमहा मिळवा हजारो रुपये